• Download App
    BHAVNA GAWLI : चिकनगुनियाची लागण झाल्याने ; चौकशीला हजर राहू शकत नाही:भावना गवळींचं ईडीला उत्तर । Shivsena MP Bhavna Gawli cannot appear before ED suffering from Chikanguniya

    BHAVNA GAWLI : चिकनगुनियाची लागण झाल्याने ; चौकशीला हजर राहू शकत नाही:भावना गवळींचं ईडीला उत्तर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांना 18 ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचलनालयाने (ED)दुसरं समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, आता त्यांच्या या दुसऱ्या नोटीशीला भावना गवळी यांनी आपल्या वकिलांमार्फत उत्तर पाठवलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्याला चिकनगुनियाची लागण झाली असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आपण चौकशीला हजर राहू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आणखी 15 दिवसांची मुदत त्यांनी ईडीकडे मागितली आहे. Shivsena MP Bhavna Gawli cannot appear before ED suffering from Chikanguniya

    याआधी 29 सप्टेंबरला त्यांना ईडीने पहिलं समन्स बजावलं होतं त्यामध्ये त्यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहावं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आपण लोकप्रतिनिधी असल्याने आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला तात्काळ हजर राहता येणार नाही. असं त्यांनी ईडीला कळवलं होतं. त्यामुळे त्यांना 18 ऑक्टोबरला दुसरं समन्स बजावण्यात आलं. या समन्सला देखील उत्तर देताना त्यांनी आपण पुढील 15 दिवस तरी ईडी कार्यालयात येऊ शकणार नसल्याचं म्हटलं आहे. भावना गवळी यांच्याकडून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार असल्याचं यावेळी ईडीला त्यांच्या वकिलांनी कळवलं आहे.



    ईडीने गेल्या महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली होती. तेव्हापासूनच भावना गवळी या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. मात्र, अद्याप तरी त्या ईडीसमोर हजर झालेल्या नाहीत. दरम्यान, आता भावना गवळी यांच्याकडून ज्या पद्धतीचं उत्तर देण्यात आलं आहे त्यावर ईडी नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

    Shivsena MP Bhavna Gawli cannot appear before ED suffering from Chikanguniya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस