भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. या प्रकरणात मला अटकपूर्व जामिन मंजूर आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असतांना माझ्यावर आरोप करून वाघ या माझी बदनामी करत आहेत. यामुळे त्यांनी मला १० कोटी अबु्रनुकसानीची भरपाई द्यावी. असे न झाल्यास त्यांच्यावर मी दिवाणी आणि फौजदारी दाखल करेल, अशा प्रकारची नोटीस शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांनी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवली आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे –भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा या माझी बदनामी करत आहेत. या प्रकरणात मला अटकपूर्व जामिन मंजूर आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असतांना माझ्यावर आरोप करून वाघ या माझी बदनामी करत आहेत. यामुळे त्यांनी मला १० कोटी अबु्रनुकसानीची भरपाई द्यावी. असे न झाल्यास त्यांच्यावर मी दिवाणी आणि फौजदारी दाखल करेल, अशा प्रकारची नोटीस रघुनाथ कुचीक यांनी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवली आहे. अॅड हर्षद निंबाळकर यांनी ही नोटीस दोन दिवसांपूर्वी सादर केली असून वाघ यांना बुधवारी सकाळी ही नोटीस मिळाली.Shivsena leader Raghunath kuchik send १० cr defarmtion notice to BJP leader Chitra wagh
रघूनाथ कुचीक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर चित्रा वाघ यांनी कुचीक यांच्यावर हल्लाबोल केला होता. कुचीक यांना जामिन देण्यावरही त्यांनी सवाल उठवला होता. या बाबत पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुचीक यांच्यावर आरोप केले होते. कुचिक व संबंधीत तरुणीमधील दुरध्वनीवरील संवाद त्यांनी पुढे आणत राज्यसरकारवर आरोप केले होते आणि कूचीक बलात्कारी असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणी कुचीक यांची बदनामी झाल्याने त्यांनी चित्रा वाघ यांना ही नोटीस पाठवली आहे. या बाबत कुचीक यांचे वकिल अॅड. निंबाळकर म्हणाले, चित्रा वाघ यांच्या आरोपामुळे कुचीक यांची बदनामी झाली आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्यावर आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. जवळपास १० कोटींचा हा दावा आहे. त्याही नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहे.त आहे, असा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी पिडीत तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलतांना वाघ व त्यांच्या साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट पिडीत तरुणीने केला आहे. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे चित्रा वाघ यांच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध केला आहे.
Shivsena leader Raghunath kuchik send १० cr defarmtion notice to BJP leader Chitra wagh
महत्त्वाच्या बातम्या
- बारामती परिमंडलातील अनेक गावात भारनियमनाचा फटका
- राजकीय जमवाजमव “ऑफर” : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंना; तर रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना!!
- न्यूयॉर्कमध्ये दोन शिखांवर हल्ला ; लाठ्या काठ्यांनी मारले आणि नंतर उतरवली पगडी ; रिचमंड हिल्सची घटना, एकाला अटक
- Nawab Malik – Dawood : दाऊद – हसीना पारकर कनेक्शन भोवले; नवाब मलिकांच्या