शिवसेनेतला एकनाथ शिंदे यांचा गट फुटून त्यांनी भाजप बरोबर युती करून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेतल्या आमदारांचा जो असंतोष उफाळला आहे त्यातून या सगळ्या आमदारांचा कटाक्ष शिवसेनेतल्या चौघांच्या कोंडाळ्यावर दिसून आला आहे. अर्थातच हे नेतृत्वाभोवतीचे कोंडाळे आहे. shivsena gulabrao patil speech in vidhansabha
पण पक्ष नेतृत्वाभोवतीचे असले कोंडाळे हे काही फक्त शिवसेनेचे वैशिष्ट्य नाही. ते बाकीच्या पक्षांचेही वैशिष्ट्य नेहमीच राहिले आहे. शिवाय नेतृत्वा भोवतीची कोंडाळी बदलल्याची देखील उदाहरणे आहेत. राज ठाकरे आणि नारायण राणे हे देखील शिवसेनेच्या नेतृत्वाभोवती असणाऱ्या कोंडाळ्याला कंटाळूनच बाहेर पडले होते. त्यांनी तसे जाहीर उल्लेखही केले होते.
आता शिवसेनेच्या एक एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेच्या चौघांच्या कोंडाळ्याचा उल्लेख करून त्यांना टार्गेट केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भोवती संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांचे कोंडाळे होते. त्यांचाच उपद्रव झाल्यामुळे उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असाच सूर गुलाबराव पाटलांसह अनेक आमदारांनी लावला आहे आणि आता ते या कोंडाळ्याला भरपूर शिव्यांची लाखोली वाहतानाही दिसत आहेत. नारायण राणे, आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या विठ्ठलाभोवती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती बडवे जमा झाल्याचा उल्लेख केला होता. विठ्ठलाला कोंडल्याचाही उल्लेख त्यांनी केला होता. तो सरळ – सरळ उद्धव ठाकरे यांच्यावरचा हल्लाबोल होता.
पण आता शिवसेनेचे विठ्ठल हे स्वतःच उद्धव ठाकरे झाल्यामुळे त्यांच्या भोवतीचे कोंडाळे संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई हे झाल्याचे सांगत त्यांना एकनाथ शिंदे गटाने टार्गेट केले आहे. शिवसेनेतल्या कोंडाळ्यामुळे त्यांच्यामुळे सत्ता गेल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केला आहे.
गुलाबराव पाटलांना उत्तर देताना संजय राऊत यांनी या चौघांच्या कोंडाळ्यामुळेच तुम्ही अडीच वर्षे सत्तेवर होतात. मंत्री राहिलात, असा टोला हाणला आहे. पण हा टोला
हाणण्यामध्येच संजय राऊतांचे आपण त्या कोंडाळ्याचा एक घटक असल्याची कबुली देखील आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सत्तेवर असताना अनेक जण या कोंडाळ्याचेच गुणगान गात होते. थोडक्यात त्यांच्या ओव्या आळवत होते. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाची सत्ता गेली त्यामुळे थेट उद्धव ठाकरे यांना शिव्या देता येत नाहीत म्हणून मग त्यांच्याभोवतीच्या कोंडाळ्याला मनसोक्त शिव्या देऊन घेतल्या जात आहेत. संजय राऊतांनी गेल्या अडीच वर्षात या ओव्यांचा सुखद अनुभव घेतला आहे. ठाकरे गटाला सत्ता मिळवून देण्याचे श्रेयही घेतले आहे. मग आता सत्ता गेल्यानंतर कोंडाळ्यातला खलनायक म्हणून शिव्याही सोसणे त्यांना भाग पडत असल्याचे दिसत आहे.
shivsena gulabrao patil speech in vidhansabha
महत्वाच्या बातम्या
- रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पुराच्या धोक्यामुळे एनडीआरएफची टीम तैनात
- 75 % लोकसंख्या : झारखंडच्या गढवा मध्ये मुस्लिमांनी दबावाने बदलायला लावली शालेय प्रार्थना!!
- राम मंदिराच्या आंदोलनापासून ते उभारणीपर्यंत 500 वर्षांच्या इतिहासावर बनणार डॉक्युमेंट्री, पंतप्रधान मोदीही दिसणार
- द फोकस एक्सप्लेनर : व्हीप न पाळल्याबद्दल शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीस, जाणून घ्या, आदित्य ठाकरेंना सूट का दिली?