प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ते कदाचित काही दिवस पुढे ढकलले जाईल. तथापि आता विधान परिषदेतला विरोधी पक्षनेते पदाचा वाद पुढे आला आहे. सध्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आहे. परंतु, आता शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप नेते म्हणून प्रवीण दरेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद राहण्याची शक्यता कमी आहे. कदाचित त्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल. Shivsena demands opposition leaders position in maharashtra legislative council
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे घटाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावे अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पाठविले आहे. शिवसेनेचे विधान परिषदेत 13 आमदार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये हे सर्वाधिक आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर वर वर पाहता शिवसेनेची मागणी रास्त वाटते. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटात यातले नेमके किती आमदार आहेत?, याचा हिशेब लागलेला नाही. विधानसभा शिवसेना पक्षात दोन तृतीयांश फूट पडून 40 आमदार शिंदे गटात आधीच गेले आहेत.
विधान परिषदेत मात्र अद्याप कोणते आमदार नेमके कोणाकडे?, याचा हिशेब लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने 13 आमदार ठाकरे गटात असल्याचा दावा केला आहे तो उपसभापती नीलम गोऱ्हे कशा पद्धतीने मानतात की त्या स्वतःच शिवसेनेच्या असल्यामुळे निर्णय देऊन मोकळ्या होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shivsena demands opposition leaders position in maharashtra legislative council
महत्वाच्या बातम्या
- मद्रास हायकोर्टाचा निकाल : पत्नीने मंगळसूत्र काढणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता!
- ललित मोदी-सुष्मिता सेन करणार लग्न : ट्विट करून माजी मिस युनिव्हर्सला बेटर हाफ म्हटले, दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले- डेटिंग सुरू, लग्नही करणार!
- Ripudaman Singh Malik : शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, कनिष्क विमान बॉम्बस्फोटात आले होते नाव
- केरळकडे आता स्वतःची इंटरनेट सर्व्हिस, असे करणारे देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले