• Download App
    Shivsena विदर्भातल्या जागा शिवसेनेला सोडल्या, तर काँग्रेसला संख्याबळ घटायची भीती; मुख्यमंत्री पदावर सोडावे लागेल पाणी!!

    Shivsena : विदर्भातल्या जागा शिवसेनेला सोडल्या, तर काँग्रेसला संख्याबळ घटायची भीती; मुख्यमंत्री पदावर सोडावे लागेल पाणी!!

    नाशिक : महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा वाद किरकोळ 4 – 6 जागांवरचा विषय उरलेला नसून शिवसेनेने विदर्भातल्या जागांवर दावा सांगून जी “राजकीय मेख” मारून ठेवली आहे, तिचे भविष्यकालीन परिणाम लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी सध्या ताणून धरल्याचे चित्र दिसत आहे. कारण जागावाटपाचा संबंध संख्याबळाशी आणि संख्याबळाचा संबंध थेट मुख्यमंत्री पदाच्या दाव्याशी आहे.

    विदर्भातल्या 62 जागा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या 62 जागांच्या बळावर काँग्रेसला महाविकास आघाडीत वरचष्मा राखता येणार आहे. आघाडीत ज्याचे संख्याबळ जास्त, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरले, तर काँग्रेस विदर्भावरच मदार ठेवून नंबर 1 चा पक्ष ठरू शकते. हे महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना निश्चित माहिती आहे. पण शिवसेनेने तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे. अशा स्थितीत “नंबर गेम” मध्ये काँग्रेस पेक्षा मागे पडू नये म्हणून शिवसेनेने स्वतःचा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण हा बालेकिल्ला वगळून आपली ताकद नसलेल्या विदर्भात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर दावा सांगितला आहे. यातून शिवसेनेचे बळ वाढेल की नाही हा भाग अलहिदा, पण काँग्रेसचे संख्याबळ मात्र घटून शिवसेना आणि काँग्रेस हा सामना मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीने बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे.

    या सगळ्या राजकारणाची जाणीव काँग्रेस नेत्यांना असल्यामुळे, किंबहुना असली राजकारण काँग्रेस नेते कोळून प्यायला मुळे त्या पक्षाच्या नेत्यांनी मुंबईतल्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेला ताणून धरलेच, पण दिल्लीत जाऊनही त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे तोच आग्रह धरला. शिवसेनेला दिलेल्या 8 जागा पुरेशा आहेत. त्यांचा 12 जागा खेचून घेण्याचा आग्रह मान्य करण्यात काँग्रेसचा संख्याबळाचा तोटा आहे. त्यातून मुख्यमंत्रीपदावर देखील पाणी सोडावे लागू शकते, हे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी हायकमांडच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चालविला आहे, जो काँग्रेसच्या दृष्टीने राजकीय तर्कसंगत आहे.

    त्यामुळे आता काँग्रेसचे हायकमांड नेमका कोणता निर्णय घेते?? शिवसेनेचा विदर्भातला आग्रह मान्य करून मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर शिवसेनेला आपल्या “टर्म्स एंड कंडिशन्स”वर झुकवते का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण 2004 मध्ये काँग्रेसचे आमदार कमी असताना देखील शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीकडून काँग्रेसने मुख्यमंत्री पद असेच खेचून घेतले होते. शिवाय काँग्रेसचा वाटाघाटींचा इतिहास तोट्यापेक्षा फायद्याचा जास्त आहे.

    Shivsena claim on vidarbha to reduce numbers of Congress MLAs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक