• Download App
    Shivsena - BJP alliance शिवसेना - भाजप युती तुटली, त्यावर दावे - प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??

    शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??

    नाशिक : शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??, असा विचार करायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांनी आणली.

    सिक्कीमचे राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते ओम प्रकाश माथुर यांच्या सत्काराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या जागा वाटपाचा आढावा घेतला, त्यावेळी शिवसेना 147 आणि भाजप 127 असे जागावाटप करून शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भाजपचा उपमुख्यमंत्री असे ठरले होते. त्यावेळी ओम प्रकाश माथुर त्या चर्चेत होते, पण उद्धव ठाकरे 151 जागांवर अडले म्हणून युती तुटली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस प्रामाणिकपणे युतीच्या बाजूनेच होते. त्यांना महाराष्ट्रात युती हवी असेच वाटत होते, पण दिल्लीचे नेते मात्र युती तोडायची या इराद्यानेच चर्चेला आले होते. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत याचा फायदा घ्यायचा आणि भाजप – शिवसेना युती कायमची तोडून भाजप वाढवत राहायचा हा त्यांचा इरादा होता, असे संजय राऊत म्हणाले त्यापुढे देखील संजय राऊत यांनी बरीच वक्तव्य केली पण ती फडणवीस यांच्या वक्तव्याला छेद देणारी ठरली.

    पण या दोन्ही नेत्यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेने 2014 नंतरच्या तीन निवडणुकांमध्ये नेमका कोणाला धडा शिकवला आणि कसा धडा शिकवला??, याचे उत्तर मात्र आकडेवारीतून मिळते. भले उद्धव ठाकरे त्यावेळी 151 जागांवर अडून राहिले असतील, पण त्यामुळे युती तुटली आणि उद्धव ठाकरे सगळ्या बाकीच्या पक्षांची स्वतंत्र लढून स्वतःच्या शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणू शकले होते. शेवटी भाजपला त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार बनवावे लागले होते. शरद पवारांनी त्यावेळी मध्ये घुसून परस्पर पाठिंबाची काडी टाकून पाहिली होती, पण त्यामुळे शिवसेनेची थोडी बार्गेनिंग पॉवर घटली. त्यापलीकडे पवार दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये फारसे दूर करू शकले नव्हते, पण उद्धव ठाकरेंचीच बुद्धी फिरली आणि त्यांच्या सततच्या चुकांमुळे नंतर शिवसेना घसरत गेली.



    अगदी 2019 च्या निवडणुकांमध्ये युती होऊन देखील उद्धव ठाकरेंनी भाजपा बरोबरची युती निकालानंतर तोडली. शरद पवारांबरोबर आघाडी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवले, पण ते औट घटकेचे ठरले. 2022 नंतर तर त्यांना शिवसेना फूट स्वतःच्या डोळ्यासमोर पहावी लागली. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसले, पण उद्धव ठाकरे त्यांना रोखू शकले नाहीत. त्या पाठोपाठ शरद पवारांचे राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले.

    पण पण 2014, 2019 आणि 2024 या सलग तीन निवडणुकांमध्ये जनतेने दिलेल्या कौलाचे एक सूत्र जर लक्षात घेतले, तर भाजपचे प्रत्येक निवडणुकीत 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आले, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार टप्प्याटप्प्याने घटत गेले. जनतेचा असलेला मर्यादित कौल देखील ठाकरे आणि पवार या दोन्ही नेत्यांना टिकवता आला नाही. केवळ माध्यमांनी चढवून ठेवलेले नेते या पलीकडे ठाकरे आणि पवारांची कुठली राजकीय किंमत उरली नाही.

    – माध्यमनिर्मित चाणक्य आणि वाघ कायमचे घसरले

    2022 मध्ये शिवसेना फुटली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपला येऊन मिळाले. या दोघांचाही स्वतंत्र राजकीय कर्तृत्वाचा कुठलाही इतिहास नसताना भाजपच्या सहाय्याने त्या दोघांनाही 2024 च्या निवडणुकीत विशिष्ट यश मिळाले, जे त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीचा पाया ठरले. जनतेने भाजपच्या बाजूने सर्वांत मोठा कौल दिला, जो कौल उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना कधीच दिला नव्हता. कारण ठाकरे आणि पवारांना कुठल्याच निवडणुकीमध्ये ट्रिपल डिजिट आमदार निवडून आणता आले नव्हते.

    त्यामुळे शिवसेना – भाजप यांची युती राहिली किंवा टिकली, त्यावेळी दोन्ही पक्षांना मर्यादित यश मिळत होते. ते डबल डिजिट पुरतेच मर्यादित होते. त्यापलीकडे जाऊन दोन्ही पक्ष वाढू शकत नव्हते, पण युती तुटली आणि ज्याची संघटना बळकट ठरली, त्याने शंभरी गाठली, हेच महाराष्ट्राच्या जनतेला जनतेने आपल्या कौलाच्या आधारे सिद्ध केले. त्यामध्ये माध्यम निर्मित चाणक्य आणि माध्यम निर्मित वाघ कमी पडले, त्याला कोण काय करणार??

    Shivsena – BJP alliance break; peoples mandate taught a lesson

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!