प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतल्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत बंड करून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणले. या बंडाचे लोण खासदारांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. Shivsena appointed Rajan vichare as loksabha chief whip, replacing bhavana gavli
शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी संपर्क साधून असल्याच्या बातम्या आहेत. भावना गवळी आणि राहुल शेवाळे या खासदारांनी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उघडपणे पत्र लिहून तशा भावना कळवल्या आहेत. खासदार राहुल शेवाळे यांना राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करायचे आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने एक राजकीय चाल खेळून खासदार भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे. खासदार राजन विचारे हे ठाणे जिल्ह्यातलेच असून एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यात त्यांना काटशह देण्यासाठी राजन विचारे यांच्याकडे प्रतोद पदाची जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे. दस्तूर खुद्द राजन विचारे यांनी आपला कल एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखविल्याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. परंतु, खुद्द त्यांनी मात्र त्याला दुजोरा अद्याप दिलेला नाही.
या पार्श्वभूमीवर राजन विचारे यांची नियुक्ती लोकसभेतल्या प्रतोपदी करणे ही खेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाला अनुकूल ठरणार की प्रतिकूल ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shivsena appointed Rajan vichare as loksabha chief whip, replacing bhavana gavli
महत्वाच्या बातम्या
- होय, रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान!!; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर
- वीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वावरच सरकार चालणार!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका
- अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन परेडमध्ये गोळीबार : शिकागोत इमारतीच्या छतावरून हल्लेखोराने केला अंदाधुंद गोळीबार; 6 ठार, 31 जखमी
- नौदलात अग्निवीर होण्यासाठी 3 दिवसांत 10 हजार महिलांची नोंदणी, 15 जुलैपासून ऑनलाइन अर्जांना सुरुवात