विशेष प्रतिनिधी
पुणे :दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घालत हिंदी सिनेमालाही तोड दिली .या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. shivrayancha chhava marathi cinema soon
चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.
या सिनेमाची गाणी या सिनेमातील डायलॉग सगळंच गाजलं . आणि या सिनेमाच्या टीमने केलेल्या प्रमोशनमुळे ह सिनेमा महाराष्ट्रातं आणि जगभरात घराघरात पोहोचला .आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘शिवरायांचा छावा असं आहे.
नुकतीच एक पोस्ट शेअर करुन दिग्पाल लांजेकर यांनी या आगामी चित्रपटाची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आलेली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं-
“उजळला तेजाने, पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा
शत्रू होई परास्त,
असा ज्याचा गनिमी कावा
शिवशंभूचा अवतार जणू
अवतरला ‘शिवरायांचा छावा’
छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा,’16 फेब्रुवारी 2024 पासून फक्त चित्रपटगृहात!”
shivrayancha chhava marathi cinema soon
महत्वाच्या बातम्या
- सई ताम्हणकरच्या ११ व्या घरासाठी प्रिया बापटची खास पोस्ट!
- MP Election 2023 : भाजपाने ३९ उमेदवारांची यादी केली जाहीर, सहा महिलांना दिले निवडणुकीचे तिकीट
- नेदरलॅंडमधील आइंडहोव्हन शहरात ढोल-ताशांच्या गजरात निघाली गणरायाची जंगी मिरवणूक
- व्हॉट्सअॅप चॅनलवरही पंतप्रधान मोदींचा दबदबा, एका आठवड्यात सब्सक्राइबर संख्या ५० लाखांच्या पुढे