प्रतिनिधी
मुंबई : शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना यांच्यावर शरसंधान साधताना अनावश्यकपणे किंवा नेहमीच्या सवयीने ब्राह्मण समाजाला डिवचले. ब्राह्मण समाजात शिवाजी संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, असा दावा भुजबळाने केला. पण भुजबळांचा हा दावा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पुरावे देऊन खोडला आहे. इतकेच नाही, तर शिवाजीराव पटवर्धन ते संभाजीराव गोखले अशा अनेक नावांची मांदियाळी देऊन शिवराय कुलकर्णी यांनी भुजबळांचे कान टोचले आहेत. Shivray kulkarni gives befitting reply to chagan bhujbal on brahminical names row
त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून कोणाची नावे शिवाजी अथवा शिवराय आहेत, याची यादीच त्यात दिली आहे. पण कोणी कुठले नाव, कसे ठेवले यावरून अनावश्यक समाजाचे मूल्यमापन करू नका असेही स्पष्ट शब्दांत सुनावले.
शिवराय कुळकर्णींची फेसबुक पोस्ट अशी :
छगनराव, तुमचे मतभेद असू शकतात. पण नाहक अपप्रचार करू नका. ब्राह्मण समाजातील काही उदाहरणे देतो. माझे नाव शिवराय भास्करराव कुळकर्णी, पत्नीचे सई आणि मुलाचे शंभू. ( ही नावे श्रीशिवछत्रपतींना दैवत मानून ठेवली आहेत.)
अमरावतीत तपोवन स्थापणारे पहिले कुष्ठरुग्णसेवी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन, जेष्ठ संघ प्रचारक स्व. शिवरायजी तेलंग, विद्याधर गोखले यांचे पिता संभाजीराव गोखले, स्व. शिवाजीराव ओहळे परतवाडा, शिवराय अजय सामदेकर, अमरावती, शिवराय रवींद्र देशपांडे, नागपूर, शिवाजी जोशी सर, अमरावती, शिवराय प्रथमेश वानखडे (आई पूर्वाश्रमीची रसिका अजित वडवेकर, ब्राह्मण), प्रसाद शिवाजी जोशी ( माझा ट्विटर वरचा मित्र )… वानगीदाखल एवढे पुरेसे आहे.
किती लोकांनी आणि किती समाजाने मुलींची नावे जिजाऊ किंवा सावित्री ठेवली यावरून कोण्या समाजाचे मूल्यमापन होऊ नये. लोकांनी नावे ठेवली नाहीत म्हणून त्यांना महापुरुषांविषयी आदर नसतो, असे नाही. तुमच्या माता – पित्यांनी तुमचे ‘छगन’ नाव का ठेवले ? या नावाला काही अर्थ आहे का ? असे नाव ठेवले म्हणजे ते नेमके कोणाशी निष्ठा बाळगायचे ? त्यांच्यासमोरही ज्योतिबा, लहुजी, भीमराव पर्याय असतीलच ना!! बरं तुम्ही तुमच्या गोतावळ्यात किंवा भुजबळ कुटुंबात ज्योतिबा, सावित्री, भीमराव, अण्णाभाऊ, शाहू, लहुजी, मोहनदास, जवाहरलाल, (सरस्वती तुम्हाला चालत नाही!!) यापैकी नावं ठेवली असतील तर जरा यादी द्या. महाराष्ट्राला कळू द्या.
बरं आता समता परिषदेच्या किती कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांचे नाव ‘छगन’ ठेवले?? तुम्ही कितीही महान झाले तरी वर्तमानात आणि भविष्यात कोणीही आपल्या मुलाचे नाव छगन ठेवणार नाही. तुमचे आहे म्हणून नव्हे तर ते निरर्थक नाव आहे म्हणून.
असले फालतू मापदंड वापरू नका, जरा जबाबदारीने वागा!!
नावाविषयी प्रचंड अभिमान असलेला, जातीचा गर्व नसलेला प्रामाणिक हिंदू व भारतीय
शिवराय ‘कुळकर्णी’
(भाजप प्रवक्ते)
Shivray kulkarni gives befitting reply to chagan bhujbal on brahminical names row
महत्वाच्या बातम्या
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?
- इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, सर्वात जवळचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही अटक!