वृत्तसंस्था
चंद्रपूर : Shivani wadettiwar विधानसभा निवडणुकीची तारीख आता जवळ आली आहे. अशात प्रचार सभा जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची देखील आकापूर येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांनी जोरदार भाषण केले आहे. मात्र यावेळी बत्तीगुल झाल्याचे बघून महावितरण विभागवार देखील त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. Shivani wadettiwar
चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात शिवानी वडेट्टीवार यांची प्रचार सभा झाली. या गावात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या, तेव्हाही वीज गेलेली होती, त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सभा घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समोर आले आहे. Shivani wadettiwar
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, तुमचे जीवन अंधारात टाकायचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. भो**चे रात्रभर वीज घालवूनही यांना 800-1000 रुपये बील पाठवायला लाज वाटत नाही. या लोकांची आम्ही फजिती करू. भाजप सरकारच्या कोणत्याच भूलथापांना बळी पडू नका. विजू भाऊंना बहूमताने निवडून द्यायचे आहे.Shivani wadettiwar
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, विकास गुजरातचा होत आहे, तुमच्या गावाचा नाही. तुमच्या जीवनात अंधार पेरण्याचे काम भाजप करत आहे. तसेच, उद्या विजू भाऊ मोठ्या पदावर जाऊ शकतात. ते विरोधी पक्ष नेते असून उद्याचे मुख्यमंत्री असू शकतात, असे सांगत शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
Shivani wadettiwar daughter of the Vadettivars cursed in the rally
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक ; अवघ्या 10 लाख रुपयांसाठी खून
- Jagannath Chattopadhyay बंगालमध्ये ४२ वर्षांची सत्ता असूनही काँग्रेसचे नाव मिटले गेले – जगन्नाथ चट्टोपाध्याय
- BJP Manifesto भाजपचा जाहीरनामा- शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या; महिलांना दरमहा 2100 रुपये देणार
- Bangladesh बांगलादेशात ट्रम्प यांचा विजय साजरा करणे समर्थकांना महागात पडले!