विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापले. या घटनेची कारणे शोधण्यासाठी सरकार आणि नौदलाने संयुक्त समिती स्थापन केली. शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होताच डॉ. चेतन पाटील यांनी या प्रकरणातून हात झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुतळ्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. Engineer named in fir chetan patil reaction shivaji maharaj statue collapse
नेमकं काय म्हणाले चेतन पाटील?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीशी माझा काहीही संबंध नसून आपण फक्त चुबतऱ्याचे डिझाईन दिले होते, असा दावा चेतन पाटील यांनी केला. मी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चबुतऱ्याचे डिझाईन दिले होते. या चुबतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी त्याचे डिझाईन बनवले होते. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही. त्या पुतळ्याचे काम ठाण्यातल्या एका कंपनीला दिले होते, असा दावा चेतन पाटील यांनी केला.
J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
गुन्हा दाखल झाल्याबाबत विचारलं असता, या घटनेनंतर आता माझ्यावर गुन्हा झाल्याचे मला कळले, मी योग्य ठिकाणी माझी बाजू मांडेन, यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही चेतन पाटील यांनी व्यक्त केली.
तांत्रिक संयुक्त समिती
दरम्यान, पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आली आहे. जबाबदारी निश्चित करणे हे समितीचे मुख्य काम असणार आहे.
Engineer named in fir chetan patil reaction shivaji maharaj statue collapse
महत्वाच्या बातम्या
- J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
- Modi cabinet’s decision : मोदी मंत्रिमंडळाचे निर्णय : देशात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे बनणार, 10 राज्यांत 28 हजार कोटींच्या योजना, 40 लाख रोजगार निर्मिती
- Pension Scheme : महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू; अतिरिक्त खर्चास वित्त विभागाची मान्यता!!
- Rohan Jaitley : कोण आहेत रोहन जेटली? BCCIचे सचिव जय शहा यांची जागा घेण्याची शक्यता