विशेष प्रतिनिधी
पुणे : श्रुती गणेश गावडे ही युवती मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहे. शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती आपल्या कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची भव्य अशी १२०० चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे. त्यामध्ये तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा वेळा जाणता राजा या शब्दाचा वापर केला आहे. Shiva image from Rangoli, Modi script
शिवरायांना मानवंदना देण्यासाठी व ही रांगोळी बघण्यासाठी अनेक नागरिक जमले होते. या उपक्रमाचे आयोजन हर्षाली दिनेश माथवड यांनी केले होते.
राज्याच्या इतिहासाची गुपिते ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत. जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाची वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाची वर्णने सांगते ती मोडी लिपी कालपरत्वे अडगळीला पडते की काय असे वाटत असतानाच हा अभिनव उपक्रम श्रुती गणेश गावडे हिने केला.
Shiva image from Rangoli, Modi script
महत्त्वाच्या बातम्या
- कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- मुलींच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणासाठी एनडीए सज्ज
- दारू विकणारा सराईत एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबध्द
- Bengal Jihadi Terrorism : बंगाल मध्ये जिहादी दहशतवादाचे थैमान; ममता राजवटीत आठवडाभरात 26 राजकीय हत्या!!