विशेष प्रतिनिधी
मुंबई : मसण्या उद हा प्राणी मृतदेहाच्या मांसावर जगतो. तसे शिवसेनेचे धोरण आहे, अशी खरमरीत टीका भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, संजय पांडेय यांनी केली आहे.
कोळीवाडा येथील कांदेवाडी हिंदू स्मशानभूमी मधील लहान मुलांच्या हिंदू स्मशानभूमीचा व्यावसायिकरित्या वापर केला जात आहे. त्या मुद्यावर ते बोलत होते.Shiv Sena’s policy is like an animal living on a dead body
मुंबई महानगरपालिकेने स्मशानभूमीतील बेकायदेशीर शेड्स व बांधकाम यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ह्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे मी पत्राद्वारे लेखी तक्रार केली होती.
परंतु ,कोणतीही कारवाई झाली नाही. याचाच अर्थ मसण्या उद प्राणी जसा मृतदेहाच्या मांसावर जगतो तसे शिवसेनेचं हिंदुत्वाचे धोरण आहे. सदर प्रकारणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि १२ दिवसांत हे बेकायदेशीर कचरा विलगीकरण प्लांट हटविण्यात यावेत. अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- मसण्या उद प्राण्याप्रमाणे शिवसेनेचे धोरण
- हा प्राणी मृतदेहाच्या मांसावर जगतो
- मुलांच्या हिंदू स्मशानभूमीचा व्यावसायिक वापर
- बेकायदेशीर शेड्स व बांधकामावर कारवाई करा
- मुख्यमंत्री ठाकरे, आयुक्त चहल यांना पत्र पाठविले
- बेकायदा कचरा विलगीकरण प्लांट हटविण्यात यावेत
- अन्यथा भाजप करणार तीव्र आंदोलन
Shiv Sena’s policy is like an animal living on a dead body
महत्त्वाच्या बातम्या
- चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू
- कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न
- आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा , शाहरुख खानला दिला सल्ला ; राज्यमंत्री रामदास आठवले –
- साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्याजवळ एसटी बस भस्मसात, प्रवासी सुखरूप
- वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण