विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे कलेक्टर आहेत. त्यांच्या उत्पन्नातूनही एसटी चालू शकेल असा घणाघात भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केल आहे. परब यांचे नाव न घेता राणे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करतायत, पगार नाही, खरं तर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढं त्यानं कमवलंय.Shiv Sena’s collector has earned so much that ST from his income, Narayan Rane’s attack on Anil Parb
सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. कित्येक महिने पगार नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात.
त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे.राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आलीय.
एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Shiv Sena’s collector has earned so much that ST from his income, Narayan Rane’s attack on Anil Parb
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे