• Download App
    शिवसेनेने तोफा पुन्हा वळवल्या नारायण राणेंच्या दिशेने : विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरांचे राणेंना प्रत्युत्तर!!Shiv Sena turned the gun again towards Narayan Rane

    शिवसेनेने तोफा पुन्हा वळवल्या नारायण राणेंच्या दिशेने ; विनायक राऊत, मिलिंद नार्वेकरांचे राणेंना प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना भवनातून काल दुपारपासून आज दुपारपर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर धडाडणाऱ्या शिवसेनेच्या तोफा आज दुपारनंतर नारायण राणे यांच्या दिशेने वळल्या. कारण नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर तोफा डागल्या आहेत. त्या पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर देताना “लाव रे तो व्हिडिओ” असे म्हणत फैरी झाडल्या आहेत.Shiv Sena turned the gun again towards Narayan Rane

    शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे जुने व्हिडिओ वापरत त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण राणे यांच्या 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्याचा तो व्हिडिओ आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे बोगस उमेदवार आहेत, असे नारायण राणे म्हणत असल्याचाही व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवून घेतला आहे. आपल्यावरच्या ईडीच्या केसेस टाळण्यासाठीच नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये भाजप मध्ये उडी मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना “बॉय” म्हणून हिणवले होते. त्यांना मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेतून नव्हे, तर ट्विट करून उत्तर दिले आहे. मेडिकल कॉलेजच्या परवान्यासाठी 7 – 7 वेळा फोन करून साहेबांची परवानगी मागत होतात. तुमच्या मेमरी ची घंटी वाजली का?, असे खोचक ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी करून नारायण राणे यांना टोचले आहे.

    खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी नारायण राणे यांच्यावर सोडलेला टीकास्त्रानंतर नारायण राणे किंवा आमदार नितेश राणे काय उत्तर देतात?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    Shiv Sena turned the gun again towards Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vijaykumar Ghadge : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे थेट अजित पवारांना विचारणार जाब; “माझं चुकलंच काय?” असा सवाल करत मुंबईकडे प्रस्थान

    Girish Mahajan : “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

    Devendra Fadnavis : फडणवीसांची पवारांशी तुलना हा त्यांचा सन्मान??… की…