प्रतिनिधी
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा मंगळवारी होणार आहे. पण त्यामध्ये वर्णी लागण्यासाठी शिंदे गटात आमदारांमध्ये चुरस आहे. एकीकडे अशी चुरस असताना दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष उत्पन्न झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे. Shiv Sena-NCP-Congress struggle for opposition leader post
पण शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधान परिषद सचिवांना याबाबत पत्र दिले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय?
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे रिक्त झाले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आता विरोधकांकडून हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने जरी दानवे यांच्या नावाची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केली असली, तरी शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी याबबात काय भूमिका घेतात?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-काँग्रेसला अपेक्षा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला आहे. मात्र विधान सभेतील संख्याबळानुसार विधान सभेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची अपेक्षा आहे.
Shiv Sena-NCP-Congress struggle for opposition leader post
महत्वाच्या बातम्या