- सत्ता कशी आणायची याचा संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिला कानमंत्र
विशेष प्रतिनिधी
पिंपरी – बहुमत आणायच्या नादी लागू नका, ते आपल्याला जमणार नाही. महापालिका त्रिशंकूच असली पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो तरी १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठे स्वप्न बघत नाही की, १०० – १५० जागा येतील, तशा येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. पण महापौर आपल्याशिवाय होणार नाही हे पाहा, अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी सत्ता कशी आणायची, याचा कानमंत्र शिवसैनिकांना दिला. Shiv sena MP sanjay raut openly supports horse trading in PCMC
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांच्या मेळाव्यात त्यांनी शिवसैनिकांना सत्तेवर येण्याचा मार्ग दाखविला. ते म्हणाले, की जसे आम्ही म्हणत होतो, मुख्यमंत्री आमचाच होणार….झाला की नाही… पहिल्या दिवसापासून कोणाला माहिती होते की ५५ – ५६ आमदारांच्या बळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. पण झाला ना… तसेच इथे असे दोन चार पत्ते हातात घ्या की शिवसेनेशिवाय सत्तेचे पान हालता कामा नये, असा राजकीय सल्ला संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.
मंत्रालयापेक्षा महापालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो तरी १०० टक्के महापौर शिवसेनेचाच होणार हे लिहून घ्या. महापालिकेत कोणाला बहुमत मिळता कामा नये. महापालिका त्रिशंकूच आली पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठे स्वप्न बघत नाहीत. की, १०० – १५० जागा येतील. तशा येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर शिवसेनेशिवाय होणार नाही… असे पत्ते पिसा, असे राऊत म्हणाले.
Shiv sena MP sanjay raut openly supports horse trading in PCMC
महत्त्वाच्या बातम्या
- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, तीन महिने घेणार विश्रांती
- कोरोनावर ग्लेनमार्कचा येणार नेझल स्प्रे, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सना सुरुवात
- आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती