Shiv Sena MP Sanjay Rau : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देशमुखांवरील ईडीच्या छाप्यामुळे संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का? यामुळे यंत्रणांचं अवमूल्यन होतं आहे.” Shiv Sena MP Sanjay Raut Comment On ED Raids On Former Home Minister Anil Deshmukh House
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देशमुखांवरील ईडीच्या छाप्यामुळे संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का? यामुळे यंत्रणांचं अवमूल्यन होतं आहे.”
सीबीआय, ईडी तुमच्या पार्टीची आहे का?
अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीच्या छाप्यावर राऊत म्हणाले की, हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का, ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, यंत्रणाचं अवमूल्यन होतंय, हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. ‘विनाकारण त्रास’ हा शब्द सरनाईकांच्या पत्रातही होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही.
अयोध्येच्या महापौरांचा सीबीआय तपास करा
राऊत म्हणाले की, जर सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्याचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट आहे.
आणीबाणीला विसरा, बाऊ करू नका
संजय राऊत म्हणाले की, आता आणीबाणीला विसरा. त्याचा बाऊ करू नका. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अघोषित आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असंही ते म्हणाले.
पुणे मनपाचं काम अमानवीय
राऊत पुढे म्हणाले की, पुणे मनपाने काल अमानवीय काम केलं. त्याचा मी निषेध करतो. घाईघाईने महापालिकेने निर्णय घेतला. कुणाचीही पर्वा न करता गरिबांच्या घरांवरून बुलडोझर फिरवला. गरिबांना बेघर, निराधार केलं. त्या सगळ्या स्थानिकांचा आक्रोश पाहून वाटतं की माणुसकी दाखवली पाहिजे, पण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडे माणुसकी आहे कुठे?
पवारांचा सल्ला पंतप्रधानही घेतात
भाजपविरोधी आघाडीची चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठका सुरू आहे. यावर राऊत म्हणाले, शरद पवारांचं महत्त्व वाढवण्याची काय गरज आहे, त्यांचा सल्ला खुद्द देशाचे पंतप्रधान, देशातील प्रमुख नेते घेतात. भाजपने विनाकारण आरोप करू नये.
काश्मीरला शांततेची गरज
काश्मीरमधील नेत्यांच्या पीएम मोदींशी झालेल्या बैठकीबाबत ते म्हणाले की, काश्मीरला अमन आणि शांततेची गरजेची आहे. गुपकार नेते आणि पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली. ती गरजेची आहे. गोळीसोबत बोलीही हवी. प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
Shiv Sena MP Sanjay Raut Comment On ED Raids On Former Home Minister Anil Deshmukh House
महत्त्वाच्या बातम्या
- 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी
- अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप
- Oxygen Audit Committee : तुटवड्याच्या काळात दिल्ली सरकारने ऑक्सिजनची गरज चार पट फुगवून सांगितली, सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीचा अहवाल
- Corona Updates : एका दिवसात 51,225 नवे रुग्ण आढळले, 63,674 बरे झाले, 1324 जणांचा मृत्यू
- कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी