विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर : राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत महाविकास आघाडी बनविल्यापासून शिवसेनेच्या आमदारांना तोंड दाबून बुक्यांच मार खावा लागत आहे. प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बडे नेते असल्याने शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्यासमोर दबूनच राहावे लागत आहे.Shiv Sena MLAs, who were punched in the face, ran out of patience, after Chhagan Bhujbal, anger against Eknath Khadse finally came out
मात्र, आता या आमदारांची सहनशक्ती संपली आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात थेट आरोप केल्यावर आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
एखादा शूटर लावून मला मारून टाका अशी मागणीच आमदार पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, खडसे हे आजही मी युती तोडण्याबद्दल अहंकाराने सांगतात, सध्या एकनाथ खडसे यांचा डोकं ठिकाणावर नसून पक्ष बदलल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही.
त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती असताना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे.’एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये अन्यथा मी देखील लेव्हल सोडून बोलेल.
मी खडसे यांचा कधीही अनादर केला नसून बोलताना मात्र एकनाथ खडसे आणि तोंडाला कुलूप लावावे असे सांगून पाटील म्हणाले, व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून खडसेंनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी.
जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे. माझे छोटे कुटुंब असून माझा बाजूने कोणी बोलणारेही नाही. आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे.
Shiv Sena MLAs, who were punched in the face, ran out of patience, after Chhagan Bhujbal, anger against Eknath Khadse finally came out
महत्त्वाच्या बातम्या
- आता यूकेहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक , आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे देखील आवश्यक
- अमित ठाकरे यांचा मुंबईच्या खड्डयांमुळे लोकलचा प्रवास मुंबईतील खड्डे बुजविण्यात शिवसेनेला अपयश
- नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदल भरती
- अगोदर शेतकऱ्यांना तातडीची मदत करा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी