• Download App
    आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण "25" चे गौडबंगाल काय...?? Shiv Sena MLAs are already angry, Congress MLAs added

    Congress Unrest : आधीच शिवसेनेचे आमदार नाराज, त्यात काँग्रेस आमदारांची भर!!; पण “25” चे गौडबंगाल काय…??

    आधीच शिवसेनेचे 25 आमदार नाराज… त्यात आता काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीचे ही भर…!! अशी अवस्था महाराष्ट्रात येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे काही आलबेल चालले आहे. ठाकरे – पवार सरकार उत्तम चालले आहे, असे अतिवरिष्ठ नेते भासवत असले तरी तीनही पक्षांच्या आमदारांनी मध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे. त्यातही “25” या आकड्याचे गौडबंगाल आहे…!!Shiv Sena MLAs are already angry, Congress MLAs added

    आधीच शिवसेनेचे 25 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपाच्या मुद्यावरुन नाराज आहेत. त्यात आता काँग्रेसच्या देखील 25 आमदारांची भर पडली आहे. काँग्रेसचा हा आमदारांचा आकडा देखील “25 च” आहे… हेच ते नेमके गौडबंगाल आहे…!!

    – सोनिया गांधींना आमदारांचे पत्र

    काँग्रेसच्या 25 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीच्या तक्रारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून कळवल्या आहेत. त्यातही काँग्रेसच्या आमदारांचा भर काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराजीचा अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सतत संपर्कात असतात. त्यांना निधी वाढवून देतात. पण महाविकास आघाडी मधील ठाकरे – पवार सरकार मधले काँग्रेसचे मंत्री मात्र काँग्रेसच्याच आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या निधीबाबत कुचराई करतात, असे थेट आरोप या पत्रात करण्यात आल्याची बातमी इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे.

    – काँग्रेस मंत्र्यांचा समन्वय नाही

    गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आमदारांची मंत्र्यांबरोबर समन्वयाची बैठक देखील झाली नाही, याची आठवण आमदारांनी या पत्रात करून दिल्याचे बातमीत म्हटले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी एक समन्वय समिती नेमली होती. काँग्रेसच्या मंत्र्यांकडे प्रत्येकी 3 – 3 आमदारांच्या तक्रारी निवारणाची जबाबदारी दिली होती. पण त्यानंतर मात्र सगळीकडे सामसूम आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या तक्रारीची दखल कोणी घेत नाही, अशी गंभीर तक्रार 25 आमदारांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

    – शिवसेना आमदारांच्या उघड तक्रारी

    शिवसेनेचे देखील 25 ते 30 आमदार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून उघडपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. निधी वाटपात अजित पवार अन्याय करतात, असा आरोप या आमदारांनी आकडेवारीनिशी केला आहे.

    – शिवसेना – राष्ट्रवादीत धुमश्चक्री

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार – खासदारांना मध्ये स्थानिक पातळीवर अक्षरशहा राजकीय धुमश्‍चक्री आहे. एकमेकांच्या मतदारसंघांमधील फोडाफोडीची स्पर्धा त्यांच्यात चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधल्या 44 पैकी 25 आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिणे आणि नाराजी व्यक्त करणे यातून महाविकास आघाडी मधले सुप्त ज्वालामुखी आता स्फोटाच्या तयारीत आहेत हेच दिसून येत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी उघडपणे तक्रारी केल्या. काँग्रेसच्या आमदारांनी आता पत्र लिहून तक्रारी केल्या आहेत. यापैकी कोणाचेही नाव इकनॉमिक टाईम्स बातमीत नाही.

    – शिवसेना खासदारांची लढाईची तयारी

    पण शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले होते. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची मैदानात येऊन लढण्याची तयारी झाली आहे.

    – आमदारांची नाराजी की सुप्त ज्वालामुखी?

    अशा स्थितीत काँग्रेसचे आमदार ते ही 25 एवढ्या मोठ्या संख्येने नाराज असतील तर महाविकासआघाडी तला असंतोषाचा आणि संतापाचा ज्वालामुखी किती खदखदतो करतो आहे हेच यातून दिसून येत आहे त्यातही “25” हा नाराज आमदारांचा आकडा काही विशिष्ट राजकीय गौडबंगाल तर सांगत नाही ना…!! आघाडीतील कोणत्याही पक्षाचे 25 आमदार एकत्रितपणे फुटणे हे भाजपच्या दृष्टीने सत्तेवर येण्याचे गणित आहे… असे तर नाही ना…??

    Shiv Sena MLAs are already angry, Congress MLAs added

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!