Shiv Sena Leader Tanaji Sawant : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वृक्षलागवडीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरू द्या असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या वक्तव्याबद्दल भरणेंवर कडाडून टीका केली असून त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे. Shiv Sena Leader Tanaji Sawant Warns Minister Datta Mama Bharane on His Statment On CM Thackeray In solapur
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वृक्षलागवडीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरू द्या असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या वक्तव्याबद्दल भरणेंवर कडाडून टीका केली असून त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे.
भरणे यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक्त केला होता. माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणेंनी औकातीत राहावे, असा दम भरला.
याबाबत तानाजी सावंत यांचाही एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा. सोलापूर जिल्ह्याची बाँड्री, तुम्हाला उजनी धरण ओलांडू देणार नाही, ही शिवसैनिकांची ताकद एका क्षणात तुम्हाला दाखवू शकतो. फक्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेश आणि महाविकास आघाडीचं बंधन आम्ही पाळत आहोत, असा इशाराच त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकारावर दिलगिरी व्यक्त करताना भरणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांविषयी विधान अनावधानाने झालं. त्याचा विपर्यास करू नये. शिवसैनिकांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, आमचे सर्वांचे नेते आहेत. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कामही खूप चांगलंय, असे म्हणत भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.
Shiv Sena Leader Tanaji Sawant Warns Minister Datta Mama Bharane on His Statment On CM Thackeray In solapur
महत्त्वाच्या बातम्या
- Afghanistan Crisis : तालिबानपुढे सरकारने गुडघे टेकले, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींनी अफगाणिस्तान सोडून काढला पळ
- सरसंघचालकांचे 35 पेक्षा जास्त देशांतील 10 लाखांहून अधिक तरुणांना संबोधन, भारतात सर्व विविधता स्वीकारल्या जात असल्याचे प्रतिपादन
- अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर काय म्हणाली नोबेल विजेती मलाला युसूफझाई, वाचा सविस्तर तिची प्रतिक्रया…
- Ali Ahmad Jalali Profile : कोण आहेत अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती जलाली; अमेरिकेत जन्म, अफगाणी सैन्यात कर्नलही होते !
- मेक इन इंडियाचे यश : जो देश फक्त आयातच करायचा, तोच आता 3 अब्ज डॉलर्सच्या मोबाइल फोनची निर्यात करतोय