वृत्तसंस्था
मुंबई : गुढीपाडवा उद्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल बंद करा असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एल्गार पुकारलाय.
मुस्लिमांचा रमजान महिना सुरू असल्याने राज्यातल्या रस्त्या रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी शोरमा आणि नॉनव्हेज यांचे स्टॉल लागले पण आता गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्र सुरू होते. अनेक ठिकाणी देवीची उपासना देखील सुरू होते म्हणून रस्त्यांवरचे शोरमा आणि नॉनव्हेज स्टॉल बंद करा, अशा आशयाचे निवेदन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिले.
चैत्र महिन्यातील नवरात्रास हिंदू परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच नवरात्रात रामनवमी येते. त्याचबरोबर देवी उपासना आणि उपास सुरू राहतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्री नवरात्रा मध्ये उपवास करतात. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यांवरचे शोरमा आणि नॉनव्हेज स्टॉल बंद करण्यासाठी एल्गार पुकारला आहे. ज्यांना बंद हॉटेलमध्ये शर्मा किंवा नॉनव्हेज विकायचे आहे आणि खायचे आहे त्यांना त्याची मूभा आहे, पण रस्त्यांवर शोरमि आणि नॉनव्हेजचे स्टॉल्स नकोत, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे, याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली.