विशेष प्रतिनिधी
पुणे – शिवसेना नेते रघुनाथ कुचीक प्रकरणात हनी ट्रॅपचे नाव देताना, राजकीय षड्यंत्र आहे असे म्हणताना लाज वाटत नाही का असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.Shiv Sena leader Raghunath Kuchik rape case, isn’t it a shame to say that it is a honey trap, political conspiracy, Chitra Wagh’s question
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वाघ म्हणाल्या, 16 फेब्रुवारीला शिवसेनेचा रघुनाथ कुचिक याच्या विरोधात एफआयआर दाखल झाला. पीडितेने सर्व पुरावे पोलिसांनी सादर केले. स्पॉट पंचनामे झाले. एवढे करूनही 21 ला कुचिकला जामीन मिळतो, हे आश्चर्यकारक नाही का.कोर्टासमोर पोलिसांनी केस लावून का धरली नाही?
गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल
पोलीस आयुकतांना प्रश्न करताना वाघ म्हणाल्या, पोलिसांनी आरोपीला खुलेपणाने मदत केली? पोलीस पीडितेला न्याय देणार की आरोपीला? निर्लजपणा, मुजोरीपणा, खोटेपणा याचे हे धडधडीत उदाहरण आहे.
लग्नाच्या भूलथापा देऊन एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुचिक हा शिवसेनेचा उपनेता आणि भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. तसेच, राज्याच्या किमान वेतन समितीचा अध्यक्ष आहे.