वृत्तसंस्था
अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसर येथे शुक्रवार शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून त्यांची हत्या केली आहे. ही घटना अमृतसरमधील गोपाल मंदिर परिसरात घडली आहे. Shiv Sena leader killed in Amritsar
सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पण सुधीर सुरी ज्या शिवसेनेचे नेते होते, तिचा महाराष्ट्रातील शिवसेनेशी काही संबंध नाही. गोळ्या झाडणार्या तीन मारेकऱ्यांच्या कार वर खलिस्तानी स्टिकर्स होते.
अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार
अमृतसरच्या गोपाल मंदिराबाहेर कच-यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे त्या विरोधात सुधीर सुरी यांनी मंदिराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. याचवेळी गर्दीतून अज्ञात इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सुरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून एका हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मारेकऱ्याच्या कारवर खलिस्तानी स्टिकर्स होते.
पूर्वीही रचला होता मारण्याचा कट
गेल्या काही दिवसांपासूनच सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये 4 गॅंगस्टर्सना अटक केली होती. यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत हा खुलासा झाला होता. सुधीर सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वीच हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, असे चौकशीत उघड झाले होते. अटक करण्यात आलेले गँगस्टर्स हे रिंदा आणि लिंडा टोळीतील होते.
Shiv Sena leader killed in Amritsar
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!
- मोदी सरकारची महाराष्ट्राला भेट : 2 लाख कोटींच्या 225 प्रकल्पांना मंजूरी; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांची घोषणा
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा