प्रतिनिधी
मुंबई : देशाला स्वातंत्र्य नेमके केव्हा मिळाले यावरून संपूर्ण देशात वाद-विवाद सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्याला महाराष्ट्र दोन वर्षे झाली तो संदर्भ घेत महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, अशी उपमा देऊन संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने त्यांचे वाभाडे काढले आहेत.Shiv Sena insults the martyrs of Maharashtra on Prabodhankar’s death anniversary ..
संजय राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशीच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषेच्या जीवावर राजकीय पोळ्या भाजणारे दिवसेंदिवस खालच्या थराला जात आहेत हेच खरे, असे टीकास्त्र सोडणारे ट्विट महाराष्ट्र भाजपने केले आहे.
संजय राऊत यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात बोलताना, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला आहे. महाराष्ट्र दोनच वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला आहे. महाराष्ट्रात भगवा फडकला आहे. त्यांना जे जमले नाही ते शिवसेनेने करून दाखवले, असे वक्तव्य केले होते. त्याला महाराष्ट्र भाजपने ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिले आहे.
Shiv Sena insults the martyrs of Maharashtra on Prabodhankar’s death anniversary ..
महत्त्वाच्या बातम्या