• Download App
    शिवसेना-भाजप : एकमेकांच्या हिमती काढत राजीनाम्यांची आव्हानाची खडाखडी!!। Shiv Sena-BJP: Resolving each other's grievances by challenging resignations !!

    शिवसेना-भाजप : एकमेकांच्या हिमती काढत राजीनाम्यांची आव्हानाची खडाखडी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान दिले. त्याला शिवसेनेने प्रतिआव्हान दिले आहे. हिंमत असेल तर भाजपच्या 105 आमदारांनी राजीनामे देऊन दाखवावेत आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे प्रतिआव्हान शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. Shiv Sena-BJP: Resolving each other’s grievances by challenging resignations !!

    अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेबरोबर भाजपशी झालेल्या सर्व वाटाघाटींचा उल्लेख केला. स्वतः त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुती जिंकली, तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील मी सांगितले होते. तेव्हा ते काही बोलले नाहीत, असे म्हटले. आता ज्या दोन पक्षांची त्यांनी दोन पिढ्या संघर्ष केला त्यांच्याबरोबरच त्याला सत्तेवर मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीका अमित शहा यांनी केली होती. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात यावे. समोरासमोर भाजपशी लढावे. आम्ही तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी दिले होते.



    अमित शहा यांनी दिलेल्या आव्हानाला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 50 – 50 टक्के सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. पत्रकार परिषदेत ते जाहीर झाले होते. तरी देखील भाजपचे नेते आपल्या वचनापासून फिरले. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला, त्या भूमीत तरी अमित शहा यांनी खोटे बोलू नये, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. 2014 मध्ये निवडणूक युती तोडताना भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते?, असा खडा सवालही संजय राऊत यांनी केला.

    एकूण शिवसेना आणि भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये एकमेकांच्या हिमती काढत राजीनाम्याची आव्हान-प्रतिआव्हाने सुरू झाल्याने मोठे घमासान सुरू झाले आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या लवकरच निघणार आहेत आणि या घमासानात एक तर या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांचे पारंपारिक राजकीय शत्रू काँग्रेस – राष्ट्रवादी यांचा फायदा होईल किंवा शिवसेना आणि भाजपच्या तुंबळ राजकीय युद्धात काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष वाहून जाण्याची शक्यता आहे.

    Shiv Sena-BJP: Resolving each other’s grievances by challenging resignations !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !