विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर पुण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.Shiv Sena-BJP clash in Pune during Kirit Somaiya’s tour
किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत गेले असताना त्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने शिवसैनिकांनी जाऊन जोरदार राडा केला. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यात किरीट सोमय्या खाली पडले. पोलिसांना हस्तक्षेप करून समस्यांना शिताफीने गाडीत बसवावे लागले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध धराधरी आणि घोषणाबाजी केली.
एकीकडे एकेकाळच्या या दोन मित्रपक्षांमध्ये अशी राडेबाजी झाली असताना दुसरीकडे मात्र पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावले उचलत भाजपचे नगरसेवक फोडायचा कार्यक्रम सुरू केला आहे. वडगाव शेरी मधील भाजपच्या नगरसेवक शीतल सावंत यांनी आपले पती अजय सावंत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे 25 नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत आणण्याचा विडा उचलला आहे. आज त्यातला पहिला नगरसेवक शीतल सावंत यांच्या रूपाने सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीच्या गळाला लावला आहे.
एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये वरपासून खालपर्यंत राजकीय धुमश्चक्री चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आपली राजकीय डागडुजी करायच्या मागे लागली आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांमध्ये सत्ता नसण्याच्या काळात राष्ट्रवादीतून अन्य पक्षांमध्ये गेलेले छोटे-मोठे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीत पुन्हा आणण्याचे मनसूबे आखले जात आहेत. पुण्यातच आज भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अजितदादांची भेट घेऊन त्यांच्याशी विकासकामांवर चर्चा केली आहे. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव होता. माझा “सर्वपक्षसमभाव” आहे, असे सूचक उद्गार त्यांनी काढून भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गॅस वर ठेवले आहे.
Shiv Sena-BJP clash in Pune during Kirit Somaiya’s tour.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश
- महाराष्ट्र बँकेत ५०० पदांची भरती सुरू आजपासून २२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज प्रक्रिया
- ट्रॅफिक जाममुळे मुंबईत ३ टक्के घटस्फोट, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर महापौर पेडणेकरांची टीका
- बुलंद भारत की बुलंद तस्वीर!!