Shiv Sena alliance with BJP to defeat Congress in Aurangabad : महाराष्ट्रात नुकतेच भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत काँग्रेसचा पराभव केला आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात दूध उत्पादक सोसायटीच्या निवडणुका झाल्या. ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपने बाजी मारली. एकूण 14 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना अनुक्रमे 6-6 जागा मिळाल्या. Shiv Sena alliance with BJP to defeat Congress in Aurangabad, what happened in the election of District Milk Producers society Read in details
प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्रात नुकतेच भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत काँग्रेसचा पराभव केला आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात दूध उत्पादक सोसायटीच्या निवडणुका झाल्या. ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपने बाजी मारली. एकूण 14 जागांपैकी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना अनुक्रमे 6-6 जागा मिळाल्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे या दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात दूध पावडरचा प्लांट उभारण्याबरोबरच दूध उत्पादनाचे जाळे वाढवणार आहे. यासोबतच आम्ही कोरोनाग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करू.
या निवडणुकीत बागडे यांना एकूण 274 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले सुरेश पठाडे यांना अवघी 64 मते मिळाली. या विजयाचे श्रेय बागडे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना देण्यात आले. यापूर्वीही सत्तार यांनी शिवसेना आणि भाजपच्या पुनर्मिलनाबाबत अनेकदा विधाने केली आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी आपले मार्ग बदलले होते.
राज्यात चर्चा भाजप-शिवसेना वादाचीच
या निवडणुकीत एकीकडे भाजप आणि शिवसेना एकमेकांशी हातमिळवणी करताना दिसत असतानाच राज्यात सध्या दोन्ही पक्षांमधून विस्तवही जाणार नाही असे चित्र आहे. भाजपने राजकीय सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर केल्याचे विधान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. ते म्हणाले की, एनडीए आता कमकुवत झाला आहे. यातून अकाली दल, शिवसेना असे जुने मित्र पक्ष बाहेर पडले आहेत. २५ वर्षे शिवसेना युतीत सडली अशी टीकाही त्यांनी केली. यावर भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यामुळेच एकीकडे एकमेकांना दूषणे देणारे हे दोन्ही पक्ष औरंगाबादेत एकत्र आल्यावरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Shiv Sena alliance with BJP to defeat Congress in Aurangabad, what happened in the election of District Milk Producers society Read in details
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election : यूपीत काँग्रेसची वाट बिकट, प्रियांका गांधींच्या विश्वासालाच तडा, काँग्रेसचे घोषित उमेदवारच पक्ष सोडू लागले
- पीएम मोदींच्या हस्ते 29 बालकांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान, अशी आहे निवड प्रक्रिया, वाचा सविस्तर…
- पंजाबचे माजी डीजीपी मुस्तफा यांच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर खासदार रवनीत बिट्टू यांचा आक्षेप, ट्विट करून निषेध
- इचलकरंजीत वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग,वीस लाखाचे नुकसान
- सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25000 कोटींचा घोटाळा; चौकशीच्या मागणीसाठी अण्णांचे अमित शहांना पत्र!!