विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेत भेट देण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर पडल्याने सोमय्या जखमी झाले. Shiv Sena activists beat up Kirit Somaiya in Pune
पुणे – पुणे महापालिकेत भेट देण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर पडल्याने सोमय्या जखमी झाले.
पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत सोमय्या पायरीवर पडले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. त्यांना संचेती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला.
Shiv Sena activists beat up Kirit Somaiya in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला अटक
- पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा
- आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण
- सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती
- वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!