• Download App
    कोर्लई गावात शिवसैनिक - भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने : खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांची रश्मी ठाकरेंशीही गद्दारी!!; सोमय्यांचा नवा आरोप|Shiv Sainiks in Korlai village - BJP workers face to face

    कोर्लई गावात शिवसैनिक – भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ; खुर्चीसाठी मुख्यमंत्र्यांची रश्मी ठाकरेंशीही गद्दारी!!; सोमय्यांचा नवा आरोप

    प्रतिनिधी

    रायगड : कोर्लई ग्रामपंचायतीचा सरपंच सकाळी अलिबागमध्ये रश्मी ठाकरेंचे १९ बंगले होते, असे सांगतात त्याचवेळी संध्याकाळी बंगले नव्हते, असे सांगत आहेत, त्यामुळे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिली आहे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.Shiv Sainiks in Korlai village – BJP workers face to face

    त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे, असा घणाघाती आरोप केला. किरीट सोमय्या यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते होते त्यामुळे गावात काहीवेळ शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आमने – सामने आले होते.



    शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर अनेक गंभीर आरोप केले. त्यावेळी त्यांनी सोमय्या रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे जमीन असून त्यावर १९ बंगले होते, असे खोटे सांगत आहेत. वस्तुतः त्या ठिकाणी बंगले नाहीत,

    जर तिथे बंगले दिसले तर राजकारण सोडून देईन आणि नाही दिसले तर सोमय्यांना जोड्याने मारेन, असे म्हटले होते. त्यामुळे किरीट सोमय्या हे शुक्रवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळीच कोरलई ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी निघाले, त्यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही होते.

    त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोमय्या यांच्यासोबत होते. आमदार प्रशांत ठाकूर हेही होते. त्यावेळी ग्रामपंचायतीकडे शिवसैनिकांनीही गर्दी केली. त्यावेळी भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते काही वेळ आमने सामने आले होते.

    काही वेळाने सोमय्या यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना निवेदन दिले, तसेच पोलीस ठाण्यात पत्र दिले. त्यांनी येत्या दोन दिवसांत त्या जागेत बंगले होते का, याची माहिती देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सेनेच्या कार्यकर्त्यांची अवस्था समजू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे, असे सांगत येत्या दोन दिवसांत ग्रामसेवक त्या जागेवर बंगले होते का, याची माहिती देणार आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

    Shiv Sainiks in Korlai village – BJP workers face to face

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा