Shiv Sainik Sumant Ruikar : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. आता उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं राज्य सरकारकडून आणि अनेक मंत्र्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. बीडचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ते 1 डिसेंबरपासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. मात्र, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्युनं गाठलं. Shiv Sainik Sumant Ruikar died on his journey From Beed to Tirupati for longevity of CM Uddhav Thackeray
प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. आता उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं राज्य सरकारकडून आणि अनेक मंत्र्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. बीडचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ते 1 डिसेंबरपासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. मात्र, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्युनं गाठलं.
बीडमधील शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक सुमंत रुईकर हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते. उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्याचं वृत्त कळताच त्यांनी पक्षाध्यक्षांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांनी यासाठी तिरूपती बालाजीला साकडं घालण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बीडपासून थेट तिरुपती बालाजीपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्यांनी केला. ४७ वर्षीय सुमंत रुईकर तिरुपतीला पायी चालत निघाले. तेलंगणात ते पोहोचलेही होते. पण त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. अखेर तिरुपतीला जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. वाटेतच त्यांचं दुर्दैवी निधन झालं.
शिवसेना घेणार रुईकर कुटुंबीयांची जबाबदारी
शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी ट्वीट करून सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीडहून तिरुपती बालाजी पर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प करणारे ज्येष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे कर्नाटक मधील रायचूर येथे तब्येत बिघडल्याने अचानक निधन झालं. या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा चालू केली होती. त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही.”
“राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीडहून तिरुपती बालाजीपर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प करणारे ज्येष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे कर्नाटकमधील रायचूर येथे तब्येत बिघडल्याने अचानक निधन झालं. या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा चालू केली होती. त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे. त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही.” असंही एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
Shiv Sainik Sumant Ruikar died on his journey From Beed to Tirupati for longevity of CM Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली
- Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण
- WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार
- औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…