प्रतिनिधी
नांदेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देगलूर पोटनिवडणुकीत आता भाजपचे उमेदवार असणार आहेत. Shiv Sainik Subhash Sabne is the BJP candidate against Congress from Deglaur
नांदेड जिल्ह्यातल्या राजकरणात अशोक चव्हाण यांना जबरदस्त विरोध करून उभ्या राहिलेल्या सुभाष साबणे यांच्या कट्टर शिवसेना समर्थकांना शिवसेनेचे मुख्यमंत्री राज्यावर असताना पोलिसांनी बुटांनी मारले. याच्या निषेधार्थ सुभाष साबणे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडली आहे.
भाजपने त्यांना देगलूरमधून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जगदीश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सुभाष साबणे यांची लढत होईल. सुभाष साबणे यांच्या रूपातला कट्टर शिवसैनिक फोडून भाजपने त्यांना मैदानात उतरवल्याने देगलूर मधली चुरस वाढली आहे.
अशोक चव्हाण यांच्या विरोधात सुभाष साबणे यांनी 1984 पासून लढत दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशोक चव्हाण यांच्या विरोधातील आंदोलनात शिवसेनेचे मुख्यमंत्री राज्यात असताना शिवसैनिकांना पोलिसांच्या बुटांचा मार खावा लागतो हे मला पटले नाही. त्यामुळे मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना छगन भुजबळांनी अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेला विधानसभेत मी तोडफोड केली होती. एक वर्ष मला निलंबित करण्यात आले होते. परंतु ते मी सहन केले. शिवसेनेच्या अडचणीच्या काळात आम्ही शिवसैनिक शिवसेनेच्या बरोबर होतो. पण
शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर असताना आम्हाला पोलिसांच्या बुटांचा मार खावा लागला हे मला पटले नाही, असे परखड बोल सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकवले आहेत.
Shiv Sainik Subhash Sabne is the BJP candidate against Congress from Deglaur
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला