विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज तिथीनुसारची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रभर दणक्यात साजरी केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी शिवनेरीवर शिवजन्मस्थळी दुग्धाभिषेक आणि शिवपूजन केले. मुंबईत शिवतीर्थावर जमलेल्या लाखो मनसैनिकांना राज ठाकरे यांनी शिव सुराज्याची शपथ दिली. Shiv Jayanti MNS : Raj Thackeray given oath to mns sainiks of Shiv Surajya
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेली शपथ अशी – शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व जण इथे शिवतीर्थावर जमलो आहोत, आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं यासाठी सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करु.
हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्यव्यवस्था मिळेल, इथली शहरं, गावं, तांडे, पाडे, सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल,
कामगारांना न्याय मिळेल, यासाठी जे पडेल ते करु, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्वाभिमानी, स्वाबलंबी, स्वराज्यचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू,आम्ही महाराजांचे मावळे आहोत, आम्ही महाराजांचे सैनिक आहोत, याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही, हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो, आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करत. अशी शपथ यावेळी राज ठाकरेंनी सर्व मनसैनिकांना दिली.
Shiv Jayanti MNS : Raj Thackeray given oath to mns sainiks of Shiv Surajya
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; गारठा, उष्मा देखील वाढला
- कोव्हिशिल्डचा दुसरा डोस केव्हा घ्यावा ? राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची शिफारस
- AAP Rajya Sabha : हरभजन सिंगला आमदार आदमी पार्टी पंजाबातून राज्यसभेवर पाठवणार!!
- युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु