विशेष प्रतिनिधी
ठाणे : सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची चौकशी निवडणूक आयोगाने लावली, तरी शिवसेनेने मात्र ठाण्यात बिनविरोधकांचे सेलिब्रेशन उरकून घेतले. महाराष्ट्रात 29 महापालिकांमध्ये 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधातले सगळे अर्ज मागे घेतले गेले ते का आणि कसे मागे घेतले??, याची चौकशी निवडणूक आयोगाने लावली. त्याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पण या चौकशीचे अहवाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाण्यात सेलिब्रेशन उरकून घेतले.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना – भाजपा – रिपब्लिकन सेना महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. शिंदे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर आणि राम रेपाळे यांचा समावेश होता. या ककनवेळी विजयी उमेदवारांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मला सन्मानित करण्यात आले. या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी आता इतर प्रभागातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, शिवसेना उमेदवार दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Shinde’s Shiv Sena’s celebration
महत्वाच्या बातम्या
- ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटल्याचे आरोप; त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!
- डॉ. आंबेडकरांच्या बंधुता मूल्याची समाजाला गरज; पुण्याच्या बंधुता परिषदेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवानांचे प्रतिपादन
- Cigarettes Tobacco : सिगारेटवर ₹8,500 पर्यंत उत्पादन शुल्क वाढले; हे 40% GST च्या वर, पान मसाला-गुटख्यावर नवीन उपकर
- GST collection : डिसेंबरमध्ये GST संकलन 6.1% नी वाढून ₹1.74 लाख कोटींच्या पुढे; कर कपातीनंतरही महसुलात वाढ