• Download App
    शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे|Shinde group's offer to Thackeray Come with us, sweeten the end, our party chief post is vacant

    शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे

    प्रतिनिधी

    मुंबई : आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात आम्ही पक्षप्रमुखपदावर कुणाचीही नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे, अशी थेट ऑफरच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे.Shinde group’s offer to Thackeray Come with us, sweeten the end, our party chief post is vacant

    आम्हाला या सर्व गोष्टीचा शेवट गोड व्हावा, असे वाटत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखपदापेक्षा राज्याचे मुख्यमंत्रिपद मोठे आहे, असा उपरोधिक टोलाही केसरकरांनी लावला. आता उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना मोठे पद अन् मान दिल्याचेही एका शब्दात दिसून आले.


    शिवसेनेच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन; तरीही शिंदे गटाची तडजोडीची तयारी!!


    माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला. पक्षप्रमुखपद हे पक्षापुरते मर्यादित असते तर मुख्यमंत्रिपद हे सर्व जनतेसाठी असते, असे म्हणत हे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना पक्षप्रमुखपदापेक्षा मोठे पद आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ६२ वाढदिवसानिमित्त शुभेच्छा म्हणून प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे आणा, असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. बुधवारी शिवसैनिकांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचे हजारो प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे आज मातोश्रीवर घेवून आले होते.

    लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

    आम्ही सर्व आमदार संतुष्ट आहोत. कारण जनतेच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला भाजपच्या श्रेष्ठींना भेटायला जातात यात काही गैर नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार जनतेच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल.

    आदित्यला निवडून आणण्यास २ आमदार विधान परिषदेवर

    आदित्य पुन्हा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील 2 माजी आमदारांना विधान परिषदेचे सदस्य करावे लागले. यातच सगळे आल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व जपता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    Shinde group’s offer to Thackeray Come with us, sweeten the end, our party chief post is vacant

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस