• Download App
    शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांची राजीनाम्याची तयारी; स्वीकारले आदित्य ठाकरेंचे आव्हान!! Shinde group MLA Abdul Sattar is preparing to resign

    शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांची राजीनाम्याची तयारी; स्वीकारले आदित्य ठाकरेंचे आव्हान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात जात शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका करताना हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून देऊन दाखवा असे आव्हान देत आहेत. Shinde group MLA Abdul Sattar is preparing to resign

    शिंदे गटाचे सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांना आदित्य ठाकरे यांचे आव्हान आता सत्तार यांनी स्वीकारले आहे. मी राजीनामा द्यायला तयार असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.


    महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दणका, शपथपत्रात खोटी माहिती; पोलिस चौकशीचे आदेश


    मी तयार आहे

    मी 31 जुलै रोजी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी हे नक्की केले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा राजीनामा नाकारल्यास मी काहीही करू शकत नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांना 50 आमदारांचा विचार करायचा आहे. त्यांच्या सोबतच त्यांना राज्य देखील चालवायचे आहे. पण माझ्या राजीनाम्यासंदर्भात माझे मत मी स्पष्टपणे मांडणार आहे, असं सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

    ठाकरेंचं आव्हान

    शिवसंवाद यात्रे दरम्यान शिंदे गटातील आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे त्यांचा उल्लेख गद्दार असा करत आहेत. आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि हिंमत असेल तर निवडून येऊन दाखवा, असं आव्हान त्यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांना करण्यात येत आहेत. त्यामुळेच त्यांचं हे आव्हान आपण स्वीतारलं असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

    मोठी सभा घेणार

    शिवसंवाद यात्रेदरम्यान आमच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे आले पण आमच्या मतदारसंघात आले नाहीत. महाराष्ट्रात कुठेही झाली नसेल इतकी मोठी सभा आपण आपल्या मतदारसंघामध्ये घेणार आहोत, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

    Shinde group MLA Abdul Sattar is preparing to resign

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस