वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.Shinde government’s majority test on Saturday, special session of the legislature on July 2 and 3
त्यामुळे आता शिंदे गट व भाजपचे सरकार राज्यात सत्तारूढ झाले आहे. या नव्या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करा, असे आदेश दिले आहेत. यासाठी येत्या २ व ३ जुलैला विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे.
शनिवारी (२ जुलै) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आमदार असून त्यांनी आपला गट हा शिवसेना असल्याचा दावा केला आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही १६ आमदार असून हे आमदार बहुमत चाचणीवेळी कोणत्या गटाला मतदान करणार, पक्षादेश कोण काढणार, याची उत्सुकता लागली आहे..
Shinde government’s majority test on Saturday, special session of the legislature on July 2 and 3
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रासाठी भाजपचा दूरवरचा विचार, म्हणून हा मास्टरस्ट्रोकच, वाचा खरी रणनीती
- शिंदे – फडणवीस सरकार : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व जुना योजनांचे पुनरुज्जीवन!!
- मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??
- प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचे पालन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट!!