विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकवटले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या बेछूट आरोपांचे पुरते वाभाडे काढले. Shinde Fadnavis target Jarange
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे सातत्याने फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. अशातच ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. जरांगे यांचे आरोप खोटे आहेत, पण ते आरोप खरे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला तसे स्पष्ट सांगितले, तर आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणाचा संन्यास घेऊ, असे प्रतिआव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उलट मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री असताना आपण कसे प्रयत्न केले आणि आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण कसे प्रयत्न करत आहोत, याचे तपशीलवार वर्णन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार समर्थन करून मनोज जरांगे यांचे आरोप खोडून काढले. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांबाबत विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, हे आरोप चुकीचे असून सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे, त्यात देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले :
मराठा समाजाला आरक्षण देताना मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आम्ही एकत्र बैठक घेतली होती. त्यासाठी आम्ही विशेष अधिवेशन बोलवले होते. यासंदर्भातील प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जो कायदा पारीत केला, त्यातही देवेंद्र फडणवीसांची मोठी भूमिका होती. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, असं म्हणणं, चुकीचं आहे. यात काहीही तथ्य नाही. आम्ही सरकार म्हणून जो निर्णय घेतला जातो, तो सर्वांच्या संमतीने घेतला जातो.
मनोज जरांगेंच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचंही प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन, असे प्रतिआव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिले.
Shinde Fadnavis target Jarange
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार