विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने कल्याणकारी निर्णयांचा धडाका लावला आहे. यात शुक्रवारी भर घालत मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडा मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधणार आहे. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. Shinde Fadnavis govt scheme in maharashtra
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.
डबेवाल्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प
मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12000 घरे बांधणार आहेत. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिॲलिटीने 30 एकर जागा दिली आहे. नमन बिल्डर्स या प्रकल्पातील घरांचे बांधकाम करणार आहे. नमन बिल्डर्सकडून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Shinde Fadnavis govt scheme in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- “हिंदुत्व” सोडले म्हणून ठाकरेंना शिंदेंनी ठोकले; पण शिंदे सेनेचे “हिंदुत्व” बुरखे वाटपावर आले!!
- Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर
- Devendra Fadnavis : काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पाट्या जोरात; पण मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला गेले, तर मोठा गहजब!!
- Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या जामीन याचिकेवर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने म्हटले- सुनावणी खुल्या न्यायालयात होऊ शकत नाही