Monday, 12 May 2025
  • Download App
    विरोधकांनी प्रकल्प बाहेर गेल्याचे केले आरोप; शिंदे फडणवीस सरकारने यादीच केली सादरShinde Fadnavis government submitted the list

    विरोधकांनी प्रकल्प बाहेर गेल्याचे केले आरोप; शिंदे फडणवीस सरकारने यादीच केली सादर

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आपल्या काळात आलेल्या 9 प्रकल्पांची यादीच सादर केली आहे. Shinde Fadnavis government submitted the list

    वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला. त्यानंतर आता नागपूरात होणार आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे. महाराष्ट्रातून चार ते पाच मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.



    अशातच विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या कार्यकाळात मंजूर केलेल्या प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. गेल्या ४ महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे सरकारची सत्ता स्थापन झाली. शिंदे सरकारने दावा करत गेल्या ४ महिन्यात कोणते हे प्रकल्प आहेत आणि कोणत्या ठिकाणी ते होणार आहेत त्याची यादी खालील प्रमाणे-

    1. सिनारामस् पल्प अॅण्ड पेपर प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : २० हजार कोटी रूपये

    2. सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प : नागपूर :  गुंतवणूक : ३७८ कोटी रूपये

    3. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड : गुंतवणूक : ३७५ कोटी रूपये

    4. सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : ६६२ कोटी रूपये

    5. वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : ७७९ कोटी रूपये

    6. विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प : सोलापूर : गुंतवणूक : १२६ कोटी रूपये

    7. आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प – पुणे : गुंतवणूक : ४०० कोटी रूपये

    8. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प : जळगाव :  गुंतवणूक : ६५० कोटी रूपये

    9. मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : ७५८ कोटी रूपये

    Shinde Fadnavis government submitted the list

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ