विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा गुंता सोडवायला शरद पवारांकडे (sharad pawar) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गेले. पण आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारवरच आपल्या दांडी मारण्याचे खापर फोडले. Shinde – Fadnavis government is the concern of Pawar
ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी बोलवण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित नव्हते. याच मुद्द्यावर काल बारामतीत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा आदेश बारामतीतूनच आला होता, असं छगन भुजबळ काल म्हणाले होते.
पण त्यानंतर आज भुजबळांनी सिल्वर ओक वर जाऊन पवारांची भेट घेतली. तेव्हा शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं. मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत सरकारच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकींचा पवारांनी यावेळी उल्लेख केला.
- शरद पवार दादांविरोधात सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला वर्गणीसाठी दिली अंतरिम मान्यता
पवारांनी ‘तो’ मुद्दा उपस्थित केला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना भेटले. त्यांनी काय चर्चा केली?? काय आश्वासने दिली??, हे आम्हाला माहितीच नाही, असा दावा शरद पवारांनी केला. तुम्ही लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहिती नाही, असं शरद पवार मला म्हणाले. पण वातावरण शांत राहावे. हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही, असं पवार म्हणाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.
भेटीत पवार काय म्हणाले?
वातावरण शांत राहावा. हा माझा हेतू आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. पवार म्हणाले. मीडियाला सांगा राजकारण आणणार नाही. केवळ सामाजिक प्रश्न म्हणून दोन चार लोकांबरोबर चर्चा करू. दीड तास चर्चा झाली. कुठे काय काय झालं हे सांगितलं. वकील काय म्हणतात ते सांगितलं. धनगरांच्या प्रश्नावरही चर्चा केली. त्यांनी काही सूचना दिल्या. साधकबाधक चर्चा झाली. पवार चर्चेला तयार आहेत. ओपनमध्ये चर्चा होणं कठीण आहे. त्यामुळे दोन – चार लोकांमध्ये चर्चा करणार. प्रश्न सुटण्याआधी अवघड होतात. म्हणून आम्ही आधीच समजून घेतो, असं पवारांनी म्हटल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. मी सभागृहातील गोष्टी भाषणात बोललो. मी परत सांगतो. मला राजकारणाची पर्वा आहे,. ना मंत्रीपदाची, ना आमदारकीची. राज्य शांत राहिलं पाहिजे. गोरगरीबांमध्ये दुफळी होऊ नये हे माझं मत आहे. त्यामुळे मी ओपनमध्ये बोलतो आणि साहेबांकडेही बोलतो. या प्रश्नावर मी कुणाच्याही घरी जायला आणि कुणाशीही भेटायला मला कमीपणा वाटत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
Shinde – Fadnavis government is the concern of Pawar
महत्वाच्या बातम्या
- नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!
- आंध्र प्रदेशचे माजी CM जगन रेड्डी यांच्याविरुद्ध FIR; टीडीपी आमदाराचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!
- तामिळनाडू बसपा प्रमुखाच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर; पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना ठार