प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिन्याभरापासून रखडला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता अखेर शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाले असून मंत्रिमंडळ विस्ताराला ऑगस्ट क्रांती दिनाचा मुहूर्त मिळाला आहे. म्हणजे उद्या 9 ऑगस्ट मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. Shinde-Fadnavis cabinet expansion on August Kranti Day
मंगळवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी 11 ते 4 या वेळेत राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजभवनावर देखील या मंत्रिमंडळ विस्तारासाठी लगबग सुरू झाली आहे.
कोणाला मिळणार मंत्रीपदे?
मंत्रिमंडळ विस्तारात आता शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असून कोणाला कोणती खाती द्यायची याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिवेशनालाही मुहूर्त मिळाला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. विधी मंडळात सोमवारी अधिका-यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 3 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते, पण सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे अधिवेशनाची तारीखही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तारखेवर देखील शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे.
Shinde-Fadnavis cabinet expansion on August Kranti Day
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये जयदू-भाजपमध्ये तणाव वाढला : नितीशकुमार युती तोडण्याच्या तयारीत? सर्व आमदार आणि खासदारांची बोलावली बैठक
- 2024 मध्येही मोदीच व्हावेत पंतप्रधान, पाकिस्तानी भगिनीने मागितली दुआ ; राखी पाठवून म्हणाल्या, यावेळी त्यांनी दिल्लीला बोलवण्याची आशा
- भारतीय डॉर्नियरने पाकिस्तानी लढाऊ विमानाला पिटाळून लावले, पीएनएस आलमगीरने सागरी हद्दीत केला होता प्रवेश
- शिवसेना कुणाची यावर आज सर्वोच्च सुनावणी : शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर खल