• Download App
    शिंदे - फडणवीसांचे नियंत्रण : निधी वाटपात कोणताही अन्याय झाल्याचा दावा अजितदादांनी फेटाळला!!|Shinde - Fadnavis: Ajit Dada rejects claim of any injustice in fund allocation!!

    शिंदे – फडणवीसांचे नियंत्रण : निधी वाटपात कोणताही अन्याय झाल्याचा दावा अजितदादांनी फेटाळला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी 4500 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करताना सुमारे पंधराशे कोटी रुपयांचे निधी वाटप सर्वपक्षीय आमदारांना केले. मात्र त्या संदर्भात ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी ठरले. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरभरून निधी दिला. पण शिंदे गटाच्या आमदारांवर अन्याय केला, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला होता. हा आरोप अजित पवारांनी आज फेटाळून लावला.Shinde – Fadnavis: Ajit Dada rejects claim of any injustice in fund allocation!!

    आमदार निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्वांना समसमान निधी दिलेला आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना नेहमीप्रमाणे झुकते माप देतील आणि तसेच घडले, असा आरोप ठाकरे गटाने केला होता. मात्र त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाचा इन्कार केला होता. अजितदादांनी शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी तसेच बाकीच्या पक्षांच्याही आमदारांना निधी दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले होते. त्याचाच पुनरुच्चार आज अजितदादांनी केला.



     अजितदादांवर शिंदे – फडणवीसांचे नियंत्रण

    वास्तविक शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर अजित मदादा आता दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिलेले नसून, ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. अजितदादांच्या अर्थमंत्री म्हणून असलेल्या प्रत्येक फाईलवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “नजर” आहे. अंतिम निर्णय शिंदे – फडणवीसांनी घेतला आहे. त्यामुळे 1500 कोटी रुपयांचा निधी वाटल्यास राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी मिळाला असला तरी तो इतरांनाही पुरेसा मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

     

    Shinde – Fadnavis: Ajit Dada rejects claim of any injustice in fund allocation!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक