• Download App
    Shashikant Shinde and Rohit Pawar's favorable reactions to Jayant Patil's resignation जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर शशिकांत शिंदे

    जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांच्या अनुकूल प्रतिक्रिया; मग खोडसाळपणा केला कुणी??

    jayant patil

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आज सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यानंतर बराच वेळाने शरद पवारांनी कालच नेमलेले राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. करून जयंत पाटील आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या चालवायला लावून कुणीतरी खोडसाळपणा केला, असा राग काढला.Shashikant Shinde and Rohit Pawar’s favorable reactions to Jayant Patil’s resignation

    त्यामुळे आधीच जयंत पाटील यांच्या भोवती असलेल्या राजकीय संशयाचे जाळे आणखीन घट्ट आणि विस्तृत झाले. कारण जयंत पाटलांनी राजीनामा दिल्याची बातमी सकाळी बाहेर आल्यानंतर ती सगळ्या माध्यमांनी दिली. त्यावर वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी देखील अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जयंत पाटलांच्या जागी शशिकांत शिंदे यांची निवड होणार या बातम्याही माध्यमांनी चालविल्या. त्यावर देखील शशिकांत शिंदे यांनी अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पवार साहेब देतील, ती जबाबदारी स्वीकारू आणि पार पाडू, असे ते म्हणाले.



    जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली. ते पवार साहेबांबरोबर कायम राहिले. यापुढे सुद्धा ते पवार साहेबांबरोबरच राहतील. पक्षासाठी लढत राहतील. ते पळून जाणार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त झालेल्या जयंत पाटलांना आणि पदावर येणाऱ्या शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच वेळी जयंत पाटील भाजपमध्ये येणार नाहीत, असा खुलासा केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्याच खुलाशाची री ओढली. त्यामुळे जयंत पाटलांनी तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, ही बातमी वेगवेगळ्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे “कन्फर्म” झाली. अनेक माध्यमांनी जयंत पाटलांची राजकीय कारकीर्द कशी कुठे वळली??, याची सविस्तर वर्णन केली.

    ही बातमी सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे फिरल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या बातमीवर राग व्यक्त करणारा खुलासा केला. जयंत पाटील आत्ताही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणे हा खोडसापण आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसार चालत असतो, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर द्वारे केला.

    पण या सगळ्यातून सवाल तयार झाला, की मग खोडसाळपणात नेमका केला कुणी?? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तरी ते काही राष्ट्रवादीचे नेते नाहीत. ते भाजपचे नेते आहेत‌. पण खुद्द राष्ट्रवादीतूनच शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी जयंत पाटलांनी राजीनामा दिला असे गृहीत धरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जयंत पाटील पळून जाणार नाहीत, असा टोमणा रोहित पवारांनी हाणला. मग दुपारी साडेतीन नंतर जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. पण त्यापूर्वी साधारण चार ते पाच तास जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी सगळीकडे फिरली, त्यावर ताबडतोब खुलासा का आला नाही??, असा असा सवाल तयार झाला. राष्ट्रवादीत सगळं आलबेल नसल्याचा संशय जास्त बळावला.

    Shashikant Shinde and Rohit Pawar’s favorable reactions to Jayant Patil’s resignation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!