• Download App
    बारामतीची लढाई ओरिजिनल DNA वर आली; कन्याविरुद्ध असून सून संघर्षाला दुसऱ्या सुनेकडून फोडणी!!|Sharmila pawar enters into controversy of original pawars

    बारामतीची लढाई ओरिजिनल DNA वर आली; कन्याविरुद्ध असून सून संघर्षाला दुसऱ्या सुनेकडून फोडणी!!

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : बारामतीची लढाई स्वतः शरद पवारांनी “ओरिजिनल पवार” आणि “बाहेरून आलेल्या पवार” अशी घरातल्या घरातच लावून दिल्यानंतर त्यावर महाराष्ट्रात गदारोळ उठला. सोशल मीडियात शरद पवार ट्रोल झाले. हीच का तुमची शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी भूमिका??, असा सवाल अनेकांनी पवारांना करून त्यांना खिंडीत गाठले. पवारांनी त्यावर खुलासा करून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला पण पवारांना त्याचा जो राजकीय फटका बसायचा तो बसलाच.Sharmila pawar enters into controversy of original pawars



    दरम्यानच्या काळात हा वाद थोडा बाजूला पडला. सुप्रिया सुळेंनी खरी कामे केली की अजित पवारांनीच केलेली कामे स्वतःच्या नावावर जाहीरनाम्यात चिकटवली??, असे सवाल विचारले गेले.

    बारामतीची लढत आता वेगळ्या दिशेने जात अचानक पवारांच्या दुसऱ्या सुनेने “ओरिजिनल पवार” विरुद्ध “बाहेरून आलेली पवार” या वादाला नवी फोडणी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार भाषणात पवारांच्या सुनबाई शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यामध्येच शरद पवारांचा ओरिजिनल DNA आहे आणि ती जागा आम्ही कोणीही सुना घेऊ शकणार नाही, असे वक्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी आम्हा सगळ्या सुनांना पवारांच्या मुलांची लग्न करून पवार झाल्याचा अभिमान असल्याचे सांगून टाकले.

    त्यामुळे आधीच पवारांच्या घरात पवारांची कन्या विरुद्ध पवारांची सून अशी लढाई रंगली असताना तिच्यामध्ये आणखी एका सुनेने उडी घेऊन वेगळी रंगत आणली आहे. पण पवारांनी कसाबसा शमावलेल्या वादाला शरद पवारांचा ओरिजिनल DNA सुप्रिया सुळे यांच्यामध्येच आहे, अशी फोडणी देऊन शर्मिला पवारांनी नेमके काय साधले किंवा त्यांना काय साधायचे आहे??, असे सवाल तयार झाले आहेत.

    Sharmila pawar enters into controversy of original pawars

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!