• Download App
    बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंनी डिवचले शिवसेनेला!! Sharing Balasaheb's video, Raj Thackeray ran away to Shiv Sena

    Raj Thackeray : बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंनी डिवचले शिवसेनेला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भोंगा वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचले आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
    Sharing Balasaheb’s video, Raj Thackeray ran away to Shiv Sena

    राज्यभरात सगळीकडे शांतता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. पण पहाटेच्या अजान अनेक मशिदींमध्ये भोंग्याविना पार पडल्या. वाशिम, नेरुळमध्ये अजान सुरू असताना मनसैनिकांनी हनुमान चालिसेचं पठण केले. तसेच यावेळी जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या. पोलिसांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजवल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचले आहे. पण यातून पोलीसांचीही पंचाईत झाली आहे.

    राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील अनेक भागातील मशिंदींवरील अजानचा आवाज अत्यंत कमी होता. त्यामुळे मनसैनिकांनी मुस्लीम बांधवांचे आभार मानले. तर काही भागात भोंग्यावरील अजान विरुद्ध मनसैनिकांनी हनुमान चालिसा पठण केले. त्यामुळे पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी आता राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची भोग्याविरोधात असलेल्या भूमिकेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

    ज्यावेळी माझे सरकार येईल त्या दिवशी रस्त्यावरील नमाज पठण बंद करू. जर आमच्या हिंदूकडून काही त्रास होत असेल तर मला येऊन भेटा. कारण धर्मापेक्षा राष्ट्रवाद हा मोठा आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि रस्त्यावरील पठण बंद केले पाहिजे, असे बाळासाहेब यांनी स्पष्ट केले. कोणताही धर्म राष्ट्रहितासाठी आड येता कामा नये, लोकांना त्रास होता कामा नये, हिंदू धर्म जर कोणाला त्रास देत असेल तर मला सांगा मी त्याचा बंदोबस्त करायला तयार आहे, असं बाळासाहेबांनी म्हटले आहे. धर्म विकासाचा आड येता कामा नये, मशिदीवरचे लाऊडस्पिकर खाली येतील, रस्त्यावरचे नमाज बंद होतील असे बाळासाहेबांनी त्या भाषणात म्हटले होते. बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून राज ठाकरे यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न कधी पूर्ण करणार?, असा सवालच राज ठाकरेंनी हा व्हिडिओ ट्विट करून विचारला आहे.

    मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आज पहाटे चार वाजल्यापासून संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर असलेल्या सोनापूर परिसरातील जामा मस्जिद बाहेर कडेकोट पोलीस तैनात आहेच. स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील पहाटेपासून शहरांतील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. आजची पहिली अजानही अनेक मशिदींमध्ये लाऊडस्पीकर विनाच देण्यात आली.

    महत्वाच्या बातम्या 

    Sharing Balasaheb’s video, Raj Thackeray ran away to Shiv Sena

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!