• Download App
    Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह । Share Market Updates sensex crossed 55000 level today stock market 13 august

    Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह

    Share Market : आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंग सेशनने शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्सने आज 55 हजारांचा टप्पा पार केला. आज सकाळी सेन्सेक्स 68 अंकांच्या वाढीसह 54911 च्या पातळीवर उघडला आणि निफ्टी 21 अंकांच्या वाढीसह 16385 च्या पातळीवर उघडला. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 246 अंकांच्या वाढीसह 55090 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी 75 अंकांच्या वाढीसह 16440 च्या पातळीवर व्यवहार करत होता. Share Market Updates sensex crossed 55000 level today stock market 13 august


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंग सेशनने शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्सने आज 55 हजारांचा टप्पा पार केला. आज सकाळी सेन्सेक्स 68 अंकांच्या वाढीसह 54911 च्या पातळीवर उघडला आणि निफ्टी 21 अंकांच्या वाढीसह 16385 च्या पातळीवर उघडला. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 246 अंकांच्या वाढीसह 55090 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी 75 अंकांच्या वाढीसह 16440 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

    आतापर्यंत सेन्सेक्सने व्यवहार करताना 55136 आणि निफ्टीने 16449 च्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला आहे. प्रथमच बाजाराने 55 हजारांची पातळी ओलांडली आहे. यावेळी सेन्सेक्सच्या 30 पैकी 19 समभाग हिरव्या मार्काने आणि 11 शेअर्स लाल मार्काने व्यवहार करत होते. बजाज ऑटो, टीसीएस, एलटी, आयटीसीचे शेअर्स सध्या सर्वाधिक वाढले आहेत, तर डॉ. रेड्डी, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स हे सर्वाधिक तोट्यात आहेत. मागील ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 318.05 अंक किंवा 0.58 टक्क्यांनी वाढून 54,843.98 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 82.15 अंक किंवा 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 16,325.15 वर बंद झाला.

    महागाई नियंत्रणात आली

    आजच्या तेजीच्या मागे अनेक मुख्य कारणे आहेत. जुलै महिन्यात महागाई 5.59 टक्क्यांवर आली. मे आणि जून महिन्यात ती RBIच्या 6 टक्क्यांच्या अपर रेंजच्या बाहेर होती. महागाई दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सरासरी महागाईचा अंदाज 5.9 टक्के केला होता. महागाई नियंत्रणात आल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत झाला आहे.

    अर्थव्यवस्था मजबुतीचे संकेत

    श्रम विभागाने गुरुवारी सांगितले की, बेरोजगारी सहाय्य दाव्यांची प्रकरणे गेल्या आठवड्यात 3,87,000 वरून 3,75,000 वर आली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. म्हणूनच जानेवारीच्या सुरुवातीला बेरोजगारीच्या दाव्यांची संख्या 9 लाखांच्या वर पोहोचली होती. ती आता सातत्याने घटत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबुतीचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे. सेन्सेस्क आणि निफ्टी लवकरच आणखी नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

    Share Market Updates sensex crossed 55000 level today stock market 13 august

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य