विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. शरद पवारांच्या बार्शी दौऱ्यात ही घटना घडली. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली होती. sharadp pawar car was stoppeed by maratha protesters
पण या आंदोलनाचे वैशिष्ट्य असे की, मराठा आंदोलकांनी धाराशिव मध्ये राज ठाकरे उतरलेल्या यांच्या हॉटेल बाहेर उग्र आंदोलन केले. राज ठाकरे यांच्या रूम मध्ये जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. अशोक चव्हाण यांच्याशी देखील नांदेड जिल्ह्यात मुगट गावात आंदोलकांनी वाद घातला, पण शरद पवारांनी आपला पाठिंबा आहे, एवढे एकच वाक्य बोलल्यावर मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी सोडून दिली.
शरद पवार बार्शी दौऱ्यावर असताना टेंभुर्णी – कुर्डूवाडी रस्त्यावर शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11.00 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार झाला. त्यानंतर दुपारी 4.00 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यालाही ते उपस्थित राहतील.
काय म्हणाले शरद पवार?
मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठिंबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर लगेच पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.
अशोक चव्हाणांना आंदोलकांचा सवाल
भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. आरक्षणासाठी तुम्ही काय केले??, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो??, असा सवाल आंदोलकाने केला. आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे. आरक्षण वेळेत दिले नाही, तर विधानसभेत तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असे आंदोलकांनी सुनावले. काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला . अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात सातत्याने मराठा आंदोलक चव्हाण कुटुंबीयांचा विरोध करत आहेत.
sharadp pawar car was stoppeed by maratha protesters
महत्वाच्या बातम्या
- Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!
- India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले
- Eknath Shinde : बांगलादेश हिंसाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा!
- Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!