Wednesday, 7 May 2025
  • Download App
    आमदार निलेश लंकेच्या घरी शरद पवारांची भेट ! कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारातSharad Pawar's visit to MLA Nilesh Lanka's house! A crowd of workers gathered at the door

    आमदार निलेश लंकेच्या घरी शरद पवारांची भेट ! कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारात

    शरद पवार यांनी आज थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते.Sharad Pawar’s visit to MLA Nilesh Lanka’s house! A crowd of workers gathered at the door


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. यावेळी शरद पवारांनी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली.

    निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. कोव्हिड काळात राज्यात सर्वात मोठं कोव्हिड सेंटर उभा करणारे आमदार म्हणून निलेश लंके हे नाव राज्यभर गाजलं होतं. आमदार लंके स्वत: कोव्हिड सेंटरमध्ये राहत होते.



    आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेले काम देशपातळीवर चर्चेत आले होते. तसेच लंके यांचा साधेपणा, त्यांचे साधे घर यावरही चर्चा झाली होती. शरद पवार यांनी आज थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते.

    लंकेच्या घरात शरद पववार होते, तर दारात कार्यकर्त्यांच मोठी गर्दी जमा झाली होती. पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते, त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी लंकेंच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत पवारांनी विचारपूस केली. यावेळी, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हेही हजर होते.

    Sharad Pawar’s visit to MLA Nilesh Lanka’s house! A crowd of workers gathered at the door

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    Icon News Hub