प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये. त्यांनीच अध्यक्ष राहावे. त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा ठराव त्यांनीच नेमलेल्या 15 सदस्यीय समितीने केला असून निर्णयाचा चेंडू या समितीने पुन्हा शरद पवारांच्या कोर्टात ढकलला आहे.Sharad Pawar’s resignation rejected; Committee’s ball again in Pawar’s court!!; The suspense grew
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याची माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि तो ठराव वाचून दाखवला.
शरद पवारांनी राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली असली तरी देशाला पक्षाला आणि महाराष्ट्राला त्यांची गरज असल्याने त्यांनी राजीनामा देऊ नये. त्यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहावे. त्यांनी दिलेला राजीनामा समिती नामंजूर करत आहे, असे या ठरावात समितीने नमूद केले आहे.
हा ठराव घेऊन प्रफुल्ल पटेल आणि समितीचे काही सदस्य शरद पवारांची भेट घेणार असून त्यांना या ठरावाची प्रत देऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती करणार आहेत.
या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या दोन-तीन दिवसांमधल्या घडामोडींचे वर्णन केले. त्यामध्ये त्यांनी देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी सुप्रिया सुळे शरद पवार आणि स्वतः प्रफुल्ल पटेल यांना संपर्क करून पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याची विनंती केल्याची माहिती पटेलांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्लॅन ए, प्लॅन बी असे प्लॅन तयार आहेत, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र या बातम्यांचा कोणताही मागमूसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीने केलेल्या तीन ओळींच्या ठरावात नाही. तसेच पवारांना सर्वाधिकार देणे अथवा पवारांनी काही पर्यायी व्यवस्था करणे अशा संदर्भातला कोणताही ठराव 15 सदस्यांच्या समितीने लेखी स्वरुपात केलेला नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवार पुढे काय निर्णय घेतात याचा सस्पेन्स समितीने केलेल्या ठरावामुळे आणखी वाढला आहे.
Sharad Pawar’s resignation rejected; Committee’s ball again in Pawar’s court!!; The suspense grew
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचा आज होणार फैसला, कार्यकर्त्यांच्या भावनावेगामुळे समिती ट्विस्ट देऊन नवा प्रस्ताव आणण्याची शक्यता
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत आज अंतिम निर्णय!, समितीच्या बैठकीत कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
- ‘’उद्धव ठाकरेच कुणाला पचनी पडले नाहीत; ज्यांना आपलाच पक्ष सांभाळता येत नाही, ते…’’ बावनकुळेंनी लगावला टोला!
- ‘त्या आमदारांमध्ये मीसुद्धा आहे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर अब्दुल सत्तार यांचे मोठे वक्तव्य